युवक-युवती फिरायला गेले, युवतीचा मृतदेह सापडला, युवक बाजूलाच जखमी अवस्थेत, नेमकं काय घडलं?

तरुणीचा मृतदेह सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय तरुणही जखमी अवस्थेत सापडला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

युवक-युवती फिरायला गेले, युवतीचा मृतदेह सापडला, युवक बाजूलाच जखमी अवस्थेत, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 3:15 PM

स्वप्निल उमप, प्रतिनिधी, अमरावती : जिल्ह्यातील वडुरा गवाजवळील ही घटना आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी फिरायला गेले होते. त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचं जखमी तरुण सांगत आहे. पण, त्याच्या बाजूलाच तरुणीचा मृतदेह सापडला. तो रक्तबंबाळ अवस्थित होता. त्यामुळे जखमी तरुण पोलिसांना खरं सागत आहे की, आणखी काहीतरी वेगळं घडलं, याचा तपास आता पोलीस करतील. परंतु, तरुणींचा मृतदेह सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय तरुणही जखमी अवस्थेत सापडला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणांच्या बाबतीत नेमकं काय घडलं, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.

महाविद्यालयीन मुलीचा मृतदेह सापडला

अमरावती शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वडुरा गाव आहे. या गावानजीक परिसरामध्ये एका महाविद्यालयीन तरुणीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. त्या शेजारी गंभीर जखमी अवस्थेत तिचा मित्र सापडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची माहिती

अमरावती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणारा जखमी तरुण आणि मृतक तरुणी हे भेटण्यासाठी वडुरा गावाजवळ आले होते. भेटण्यासाठी आल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी आमच्यावर हल्ला केल्याची माहिती जखमी तरुणाने पोलिसांना दिली आहे.

युवकांच्या बाबतीत नेमकं काय घडलं?

या जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये खरच हल्लेखोरांनी तरुण-तरुणीवर हल्ला केला का? दोघांचेही जीवन संपवण्याचा प्रयत्न होता की, तरुणाने तरुणीवर हल्ला केला. याचा तपास पोलीस करीत आहेत.

एकांतात फिरायला जाणे धोकादायक

एकांतात फिरायला जाणे धोकादायक असते. अशा घटना कधी-कधी घडत असतात. त्यामुळे युवकांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. हल्लेखोरांनी हल्ला करून तिला ठार केले. मला जखमी केले. असे तरुणाचे म्हणणे आहे. तरीही संशयाची सुई तरुणावर आहे. पोलीस तपासानंतरच नेमकं काय घडलं हे स्पष्ट होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.