Amravati : धारणीतील प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा आरोप, नेमकं काय घडलं? मुलीच्या नातेवाईकांनी सांगितली आपबिती
आज राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केलं. त्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली.
अमरावती : धारणी येथील एका मुलीचं लव्ह जिहादचं (Love Jihad) प्रकरण समोर आलंय. याप्रकरणी आज पु्न्हा खासदार अनिल बोंडे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा भेट घेतली. यापूर्वीही त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. या पीडित मुलीच्या नातेवाईकानं आपबिती सांगितली. त्या म्हणाल्या, मुलगी महाविद्यालयात जात होती. मुलगा गाडीनं तिथं यायचा. तो तिला भेटायला महाविद्यालयात (College) जायचा. मुलगी घरून पळवून नेल्यानंतर ही बाब आम्हाला माहीत झाली. तो मुलगा दुसऱ्या जातीचा आहे म्हणून. त्यांनी लग्नही केलं होतं. पीडित मुलीच्या तिच्या आईची तब्यत खराब झाली. मुलगी भेटायला आली. तेव्हा तिच्या पायावर गळ्यावर धागे बांधलेले होते. मुलीचं ब्रेन वॉशिंग (Brain Washing) केलं होतं.मुलीकडं काही गोळ्या सापडल्या. तीन दिवस मुलगी आमच्याकडं आल्यानंतर झोपली नाही. डोळे मोठे झाले होते. आमच्या मुलीचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला.
अनिल बोंडे यांची बजरंग दलासोबत चर्चा
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील उच्चशिक्षित मुलीला पळवून नेल्यात आलं. विशिष्ट जातीच्या व्यक्तीनं फसवणूक केली. तो व्यक्ती रुग्णवाहिकेवर चालक आहे. मुलीला अमरावती येथे आणत बळजबरीने विवाह करण्यात आला होता. असा धक्कादायक आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला होता. आज राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केलं. त्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली.
अनिल बोंडे यांचा आरोप काय?
खासदार अनिल बोंडे यांनी आंतरधर्मीय विवाहाच प्रकरण उघडकीस आणलं. बोंडे म्हणाले, चंद्रविला धर्मदाय संस्थेला लग्न लावून देण्याचा अधिकारी नाही. त्यांनी बनावट कागदपत्राचे आधारे हे लग्न लावून दिले. तो मुस्लिम काजी नसून एका मजुराची काजी म्हणून स्वाक्षरी घेण्यात आली असल्याचे पोलीस तपासात पुढे आलं. त्यामुळं चंद्रविला संस्थेविरुद्ध अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी बनावट कागदपत्रे देऊन हा विवाह लावून दिल्याचा आरोप आहे.