Video – Amravati | अमरावती महापालिकेची आमसभा ठरली वादळी, सफाई कंत्राटावरून तुफान राडा

अमरावतीच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. प्रभाग रचनेवरून बसपच्या आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाली. दोघेही एकामेकाच्या अंगावर गेल्याने काही वेळासाठी सभागृह तहकूब करावं लागलं.

Video - Amravati | अमरावती महापालिकेची आमसभा ठरली वादळी, सफाई कंत्राटावरून तुफान राडा
अमरावती महापालिकेत नगरसेवक अशाप्रकारे एकमेकांवर तुटून पडले.
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 4:44 PM

अमरावती : बसपचे नगरसेवक चेतन पवार (Chetan Pawar) व एमआयएमचे नगरसेवक अब्दुल नाझीम (Abdul Nazim) यांच्या एका प्रश्नाला उत्तर देत मनाला दुखेल असा वाक्यप्रचार केला. त्यानंतर एमआयचे नगरसेवक अब्दुल नाझीम हे सभागृहातच असे अपशब्द का बोलला यावरून बसपचे नगरसेवक चेतन पवार यांच्या अंगावर धाऊन गेले. एकच गोंधळ निर्माण केला. हे सर्व गोंधळ सुरू असताना महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रवीण आष्टीकर (Praveen Ashtikar) यांनी सभागृहातून बाहेर जाणं पसंत केलं. पण हा गदारोळ बराच वेळ चालत होता. या दरम्यान सभागृहाच्या पवित्र ठिकाणी अश्लील शिवीगाळसुद्धा करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. अमरावती महापालिकेची आजची ही शेवटचा सभा आहे. त्यामुळे या सभेत मोठा गोंधळ उडतो आहे. अमरावतीच्या महापालिकेच्या सर्वसाधारण आणि शेवटच्या सभेत गदारोळ प्रभाग रचनेवरून बसपच्या आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी दोघेही एकामेकाच्या अंगावर गेले काही वेळासाठी सभागृह तहकूब झाले.

सफाई कंत्राटावरून वाद

साफसफाई कंत्राटवरून हा वाद सुरु झाला. सुरुवातीला भाजपचे नगरसेवक गटनेते तुषार भारतीय सभागृहाचे विरोधी पक्ष नेते बबलू शेखावत यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर एमआयएमचे अब्दुल नाझीम अब्दुल रौझ व बीएसपीचे चेतन पवार यांच्यात तुफान राडा झाला. चेतन पवार यांनी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून एमआयएमचे नगरसेवक अब्दुल नाझीम अब्दुल रौझ हे पवार यांच्या अंगावर धावून गेले. शिवाजी महाराज यांचा पुतळा महानगरपालिकाने उभारावा. वेळ पडल्यास खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची मदत घ्या, अशी मागणी बसपाचे नगरसेवक चेतन पवार यांनी केली.

पाहा राड्याचा व्हिडीओ

महापौर गेले सभागृहाबाहेर

काँग्रेसविरुद्ध भाजप असा वादही यावेळी बघायला मिळाला. कचऱ्याच्या कंत्राटदारावरून वाद झाला. त्यामुळं ज्येष्ठ नगरसेवकांनी यावेळी नाराजी व्यक्त केल्याचं नगरसेवक विलास इंगोले यांनी सांगितलं. कोरोनाकाळात सफाई कर्मचाऱ्यांची वेळोवेळी स्तुती केली गेली. परंतु, प्रभार रचना बदलल्याने चर्चेतून गोंधळ निर्माण झाला. यावेळी महापौर चेतन गावंडे आणि आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर दहा मिनीटं आमसभा ही तहकूब करण्यात आली होती.

Nagpur Crime | नागपुरात खंडणी प्रकरणी चार आरोपी जेरबंद, आरोपीने हवालाचे तीस लाख पाठविले?

मी परदेशात पळून गेलो नाही, अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार; अमोल काळेंचा इशारा

Nagpur Crime | सुकामेवा खाताय सावधान!, पिस्त्याच्या जागी सडके शेंगदाणे, काय आहे हा प्रकार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.