मित्राच्या लग्नाला कारने चालले होते, पण मित्राच्या आनंदात सहभागी होण्याआधीच तरुणांवर काळाचा घाला

या भीषण अपघातात कार पलटी होऊन चक्काचूर झाला आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मित्राच्या लग्नाला कारने चालले होते, पण मित्राच्या आनंदात सहभागी होण्याआधीच तरुणांवर काळाचा घाला
डंपरने बाईकला दिलेल्या धडकेत महिला ठार
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 11:25 PM

अमरावती : सध्या लग्नसमारंभाचा काळ जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे विवाहासाठी अनेक जण कार, दुचाकीने कार्यक्रमाला पोहचण्यासाठी भरधाव वेगाने प्रवास करत आहेत. त्यामुळे सध्या अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. याच प्रकारे एका विवाहाला जात असताना लासूरजवळ कार आणि दुचाकीचा अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. भरधाव कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृ्त्यू झाला असून या अपघातानंतर काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.

या अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दर्यापूर अकोला मार्गावरील गोळेगावनजीक गुरवारी सायंकाळी घडली आहे.

प्रफुल्ल गावंडे (वय 27), प्रतिक राऊत (वय 25), दोघेही रा.बुलढाणा व सचिन रामकृष्ण दुधंडे (वय 31 रा.लासुर ता.दर्यापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर पवन रामचंद्र तायडे (वय 27) व शुभम नागपूरे (वय 25) रा.बुलढाणा हे गंभीर जखमी झाले आहेत.

ज्या दुचाकीला कारने उडवले आहे ती कार (क्र.एम.एच.12 के.एन. 4028) ने अकोला येथून भरधाव वेगाने दर्यापूर मार्गे अमरावतीला जात होते.

दरम्यान मृतक सचिन दुधंडे दर्यापुरवरून गावी लासुर येथे दुचाकी (क्रमांक एम.एच.27 डी.बी.1116) ने जात होते. गोळेगाव नजीक भरधाव कारने समोरील दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार व कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या भीषण अपघातात कार पलटी होऊन चक्काचूर झाला आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच मृतक दुधंडे यांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.