“मंत्री या विषया पेक्षा काम महत्त्वाचं”; बंडखोर आमदाराने नाराजीच्या मुद्यावर स्पष्टच सांगितले
एखाद्या गोष्टीवरून देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी असू शकते किंवा एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र याचा अर्थ असा नाही होत की, सरकारमधून आम्ही बाहेर पडले पाहिजे.
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही आमदारांसबोत अयोध्या दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र त्या दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बंडखोरी केलेले सर्वच आमदार अयोध्या दौऱ्यामध्ये सहभागी जाला नव्हते. तर काही आमदार दौऱ्यावर गेले नसल्याने त्यांच्या बदल उलटसुलट आता चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यातच प्रहारचे आमदार बच्चू कडू हेही अयोध्या दौऱ्यावर गेले नसल्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जे आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले नव्हते, त्यांची खरच नाराजी होती का की इतर काही कारणं होती.
त्याबद्दल आमदार बच्चू कडू यांना विचारला असता त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्टपणे सांगत नाराजीपेक्षा कामं होणं गरजेची आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
आमदार बच्चू कडू यांना अयोध्या दौऱ्यावर का गेला नाही असं विचारल्या नंतर त्यांनी सांगितले की, राम प्रभुबद्दल मला प्रचंड आस्था आहे.
अयोध्या दौऱ्यावर जाण्याची माझीही इच्छा होती.पण बाजार समितीच्या निवडणूक असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितेल.
त्याच बरोबर मतदारसंघात रोग निदान शिबिर घेतले असल्यामुळेही या दौऱ्यावर जाऊ शकलो नाही असंही त्यांनी सांगितले.
अयोध्या दौऱ्यावरून आता आमदारांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर आहे का अशी शंकाही व्यक्त केली जात होती. शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीवरूनही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
त्यावरूनही आमदार बच्चू कडू यांना छेडले असता त्यांनी सांगितले की, मी नाराज नाही नाराजीचे कुठलेच कारणही नाही, मात्र मंत्रिमंडळाचा आता विस्तार होणारच नाही हा विस्तार आता 2024 नंतरच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आता जरी अयोध्या दौऱ्यावर गेलो नसलो तरी कामं होण्यासाठी सरकार सोबत गेलो आहे ती कामं देखील आमची झाली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या मंत्री या विषयापेक्षा आता कामं महत्त्वाची आहेत. त्यामुळे आम्हाला भूक मंत्रीपदाची नाही तर विकास कामाची आहे अशा शब्दात त्यांनी नाराजीची टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिले आहे.
अस्वस्थता आहे इथपर्यंत ठीक आहे.पण बंडखोरी होणार नाही, आणि एखाद्या युतीमध्ये एवढं हे कारण चालणारच असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आमच्यामध्ये कधी ना कधी नाराजीचा सूर येत राहतो, जात राहतो पण म्हणून बाहेर बंड करून जाऊ असं होणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
एखाद्या गोष्टीवरून देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी असू शकते किंवा एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र याचा अर्थ असा नाही होत की, सरकारमधून आम्ही बाहेर पडले पाहिजे.