आई होऊ न शकल्यानं महिला डॉक्टरची आत्महत्या! स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून घेत जीव दिला

Amravati Suicide : आई न होऊ न शकल्यानं ही डॉक्टर महिला निराश झाली होती.

आई होऊ न शकल्यानं महिला डॉक्टरची आत्महत्या! स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून घेत जीव दिला
आत्महत्येची धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 1:24 PM

अमरावती : आई होऊ न शकल्यानं महिलेनं जीव दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका डॉक्टर महिलेनं आत्महत्या (Doctor women suicide) केल्यानं अधिकच खळबळ उडाली आहे. ही घटना अमरावतीमध्ये (Amravati Suicide) घडली आहे. आज तकनं दिलेल्या वृ्त्तानुसार साई हेल्थ केअर एंड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या संचालकाच्या डॉक्टर पत्नीनं आत्महत्या केली. स्वतःला विषारी इंजेक्शन (poison injection) या महिला डॉक्टरनं टोचून घेतलं आणि आपलं जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं अमरावतील एकच खळबळ उडाली आहे. आई न होऊ न शकल्यानं ही डॉक्टर महिला निराश झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात असलेल्या या महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. आत्महत्येनंतर या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी अकोला मेडिकल कॉलेजात पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 साली या डॉक्टर महिलेचं लग्न झालं होतं.

धक्कादायक!

पोलिसांनी याप्रकरणी प्राथमिक तक्रार नोंदवून घेतली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सध्या केला जातो आहे. संपूर्ण परिसर महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनं धास्तावलाय.

कुटुंबीयांचे पतीवर आरोप

अमरावतीत साई हेल्थ केअर एन्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज दीवाण यांची पत्नी डॉ. प्रियंका दीवाण यांनी आत्महत्या केली. डॉक्टर प्रियंका यांनी स्वचःला विषारी इंजेक्शन टोचून घेतलं आणि जीव दिला. आई होऊ न शकल्याची सल त्यांना मनात होती. अनेक दिवसांपासून त्या आई न होऊ शकल्याच्या कारणामुळे निराश झाल्या होत्या, असंही सांगितलं जातंय. दरम्यान. डॉ. प्रियंका यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी केलाय. डॉक्टर प्रियंका यांच्या पतीला या महिलेच्या मृत्यूला जबाबादार धरत कुटुंबीयांनी आक्रोश केलाय.

सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केली जातो आहे. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टनंतर ही हत्या होती की आत्महत्या होती, याबाबतचा अधिक खुलासा काय होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.

घटना उघडकीस कशी आली?

डॉ. प्रियंका मंगळवारी रात्री आपल्या बेडरुमध्ये झोपण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळी ही महिला बाहेर आली नाही. तेव्हा डॉ. पंकज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तिला डॉक्टर महिलेला उठवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ दरवाजा ठोठावण्यात आला. मात्र दरवाजा उघडला न गेल्यानं अखेर दरवाजा तोडून कुटुंबीय आत गेले तेव्हा जे दिसलं, ते भयंकर होतं. या महिलेचं मृत शरीर नीळं पडलं होतं. यानंतर तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं. सध्या या संपूर्ण घटनेप्रकरणी पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा केली जाते आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.