एकनाथ शिंदे यांचा बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारच्या एकमेव आमदाराचा शिंदे गटात प्रवेश, कडू संतापले, म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना मोठा धक्का दिला आहे. कारण बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या एकमेव आमदाराने आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडूदेखील संतापले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला.

एकनाथ शिंदे यांचा बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारच्या एकमेव आमदाराचा शिंदे गटात प्रवेश, कडू संतापले, म्हणाले...
बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 4:44 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का देण्यात आला आहे. कारण प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीला शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी दुजोरा दिला आहे. येत्या 10 तारखेला धारणी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाचे राष्ट्रीय नेते तथा माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. बच्चू कडूंचा एकुलता एक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागला आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. राजकुमार पटेल यांनी स्वत: याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तर राजकुमार पटेल यांच्या पक्षप्रवेशावरुन बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे.

शिवसेना प्रवेशापूर्वी राजकुमार पटेल यांनी धारणी शहरात कार्यकर्ता संवाद बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी आपण येत्या 10 ऑक्टोबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा राजकुमार पटेल यांनी केली. त्यामुळे राजकुमार पटेल आता आधी बहुजन समाज पार्टी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहारनंतर आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

राजकुमार पटेल काय म्हणाले?

“मी मंत्री उदय सामंत यांना म्हटलं की मला शिवसेनामधून धनुष्यबाणवर लढायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठल्याच विकास कामांसाठी नाही हा शब्द वापरला नाही. विकासाठी जेवढा निधी एकनाथ शिंदे यांनी दिला तेवढा निधी कोणीच दिला नाही आणि देणार नाही. आज आपल्याला निर्णय घ्यायाचा आहे. मी जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य आहे का? आपल्या सर्वांची तयारी असेल तर 10 तारखेला प्रवेशासाठी सर्वांनी तयार राहा”, असं आवाहन राजकुमार पटेल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बैठकीत केलं.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझं बोलणं झालं. ते तुमच्या कानावर टाकण्यासाठी तुम्हाला आज बोलावलं. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळूच शकत नाही. काही लोक म्हणतील राजकुमार पार्टी बदलण्यात माहीर आहे. पण विकासासाठी जावं लागतं. पक्ष नाही बदलला तर माझा पगार मला मिळतोच. आधी 60 होता तो आता 70 झाला. सरकारने दोन वर्षे निवडणूकसाठी वाढवले पाहिजे कारण दोन वर्षे आमचे कोरोनात वाया गेले. 10 तारखेला मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार”, असं राजकुमार पटेल यावेळी म्हणाले.

बच्चू कडू यांचा एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा

राजकुमार पटेल यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येकाचा एक वैयक्तिक स्वार्थ असतो. त्यामुळे ते गेले असतील. त्याची आम्हाला काही पर्वा नाहीय. त्यांनी जिथे असतील तिथे सुखाने राहावे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला जो घाव केला आहे त्या मोबदल्यात हजारो घाव आम्ही शिंदेंना देऊ. शिंदे गटाला सुद्धा आम्ही प्रत्युत्तर देऊ. त्यांनी एक खेळी खेळली तर आम्ही 10 खेळी खेळू. त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. आम्ही सुद्धा राजकुमार यांच्यासोबत मैत्री कायम ठेवून आमचा उमेदवार तिथे उभा करु. पण शिंदे गटाने खेळलेली खेळी त्यांना अतिशय घातक ठरेल”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.