अमरावती पोलिसांची मोठी कारवाई! धाडीत 10 किलो सोने सापडले, रोख रक्कमही जप्त

अमरावती शहरातील दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये रात्री धाड टाकण्यात आली. या धाडीत राजापेठ पोलिसांनी पाच कोटी किमतीचे तब्बल दहा किलो सोन्याचे दागिने जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. हे सोने कुणाच्या मालकीचे, तेथे कसे आणले याचा तपास पोलीस करत आहेत.

अमरावती पोलिसांची मोठी कारवाई! धाडीत 10 किलो सोने सापडले, रोख रक्कमही जप्त
अमरावती पोलिसांनी पाच कोटी रुपयांचे सोने जप्त केले. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 3:06 PM

स्वप्निल उमप

अमरावती : राजापेठ पोलिसांनी (Rajapeth Police) दिलेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंट (Dussehra Maidan Radhakrishna Apartment) आहे. या अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 401 मध्य काही व्यक्ती संशयास्पद असल्याची गुप्त माहिती मध्यरात्रीच पोलिसांना मिळाली. त्याआधारे राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे (Police Inspector Manish Thackeray) व त्यांचे पथक व्हिडीओ कॅमेरा घेऊन या अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. यावेळी त्या फ्लॅटमध्ये राजेंद्र सिंगसह अन्य दोन व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यक्तींकडे बरेच व्यवहाराचे कागदपत्र देखील होते. असंही पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सांगितलं. हे आरोपी सोने व्यापाऱ्यांच्या संपर्कात अशी माहिती समोर आली आहे.

सोन्याची किंमती सुमारे पाच कोटी

या कारवाई दरम्यान दहा किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने सापडले. याची सोन्याची किंमत पाच कोटी इतकी आहे. शिवाय पाच लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांनी आयटी विभागालाही दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील मूळच्या राजस्थानातील राजेंद्र सिंग या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयातदेखील दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितलं.

व्यवसाय चार वर्षांपासून

धाड पडली त्याठिकाणी राजेंद्र सिंग राव व्यवसाय करतो. गिरीराज जगदीश सोनी व अशोक सत्यनारायण खंडेलवाल हे त्याचे साथीदारही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. तो चार वर्षांपासून हे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कच्च्या चिठ्ठ्या-पट्ट्यांवरून काहीतरी गडबड दिसते. विशेष म्हणजे रात्री अडीच वाजता राजपेठ पोलिसांनी ही धाड टाकली. टीममध्ये पीआय अहीरकर, पीएसआय मापारी, महिला व इतर कर्मचारी असा सारा ताफा घेऊनही पोलीस पोहचले होते. त्यामुळं आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. आयटी डिपार्टमेंटला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास ते करतील. त्यानंतर हे सोने कुठून आले आणि कुठे घेऊन जात होते. याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Nagpur Crime | कारने बसस्थानकावर यायच्या, बसमध्ये बसून चोरी करायच्या, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडिलांना सोडून परतत होता युवक, गोंदियाकडे येताना टिप्परखाली आला, शरीराच्या चिंधळ्याच उडाल्या!

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.