Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video – Amravati | मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन, महिला पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची, भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली

भाजप नेते अनिल बोंडे आणि महिला पोलीस अधिकारी निलिमा आरज यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी शाब्दिक बाचाबाची करत असताना मात्र अनिल बोंडे (BJP leader Anil Bonde) यांची महिला अधिकाऱ्याशी बोलताना जीभ घसरली.

Video - Amravati | मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन, महिला पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची, भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली
अमरावती येथील राजकमल चौकात आंदोलन करताना भाजपचे कार्यकर्ते.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 1:32 PM

 अमरावती : राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल अटक केली आहे. त्यामुळे मलिक यांचा राजीनामा ( Malik’s resignation) घ्यावा, या मागणीसाठी भाजपने आज अमरावतीच्या राजकमल चौकात (Rajkamal Chowk of Amravati) आंदोलन केले. दरम्यान यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप नेते अनिल बोंडे आणि महिला पोलीस अधिकारी निलिमा आरज यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी शाब्दिक बाचाबाची करत असताना मात्र अनिल बोंडे (BJP leader Anil Bonde) यांची महिला अधिकाऱ्याशी बोलताना जीभ घसरली.

भाजपच्या आंदोलकांना अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी, ही मागणी करण्यात आली. यावेळी भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यात. यावेळी आम्हाला अटक का करता असा संतप्त सवाल अनिल बोंडे यांनी यावेळी विचारला. पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये पोलिसांमध्ये चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले.

आम्हाला अटक का करता

आम्हाला अटक का करता. आम्ही कुणाला शिव्या दिल्या का. तुम्हाला काय दहा-दहा वेळा केसेस लावायच्या एवढेच काम आहे का. तुम्ही पोलिसांची गाडी का बोलावली, असा सवाल अनिल बोंडे यांनी पोलिसांना विचारला. आम्हाला ताब्यात घ्यायचे असेल तर आम्ही आमच्या गाडीने येतो. तुम्ही जास्त काही करू नका, तुम्ही भाजपवाल्यांना त्रास देता, असा आरोपही बोंडे यांनी केला.

पाहा व्हिडीओ

मेडिकलच्या दंत महाविद्यालयात विद्रृप चेहऱ्यांवर होणार उपचार, नागपुरात इम्प्लांट किट्स लवकरच उपलब्ध

सिटी सर्व्हे विभागाची फेरफार अदालत सोमवारी, नागपूर शहरातील नागरिकांची कोणती कामे होणार?

Nagpur | महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यायामशाळेत काढला दम! मनपा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिले संकेत

धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.