Shiv Sainik | आमदार रवी राणा यांच्या घरावर दगडफेक; अमरावतीत शिवसैनिक दगड मारतानाचे सीसीटीव्ही फुटेज

या आंदोलनाप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. घरासमोर बसून राणांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी राणा दाम्पत्यांविरोधात घोषणाबाजी केली होती. आता दगडफेक झाल्याचं स्पष्ट झाल्यानं रवी राणा यांनी केलेला आरोप खरा असल्याचं स्पष्ट होत आहे.

Shiv Sainik | आमदार रवी राणा यांच्या घरावर दगडफेक; अमरावतीत शिवसैनिक दगड मारतानाचे सीसीटीव्ही फुटेज
आमदार रवी राणा यांच्या घरावर दगडफेक झाल्याचा व्हिडीओ Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 1:41 PM

अमरावती : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या घरासमोर शनिवारी संतप्त शेकडो शिवसैनिकांनी (hundreds of Shiv Sainiks) आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. परंतु कुठलीच दगडफेक झाली नसल्याचा स्पष्टीकरणं शिवसैनिकांनी दिलं होतं. दरम्यान, आता शिवसेनेच्या या आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख प्रवीण हरमकर (Praveen Haramkar) हे आमदार रवी राणांच्या घराच्या दिशेने एक दगड फिरकावताना दिसत आहेत.

अमरावती पोलीस तपास करतात

राणा दाम्पत्य शनिवारी मातोश्रीवर जाण्यासाठी मुंबईला गेले. मुंबई येथील घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केलं. त्याचवेळी अमरावती येथील घरासमोरही शिवसैनिक धडकले होते. या शिवसैनिकांना कसं आवरायंच. असा प्रश्न पडला होता. पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता. तरीही एक शिवसैनिकानं दगडफेक केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतय. त्यामुळं अमरावती पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

रवी राणांनी दगडफेकीचा आरोप केला होता

एक व्हिडीओ समोर आलाय. रवी राणा यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या घरावर दगडफेक झाल्याचा व्हिडीओ आहे. एका व्यक्तीनं रवी राणा यांच्या घराच्या दिशेनं दगड फेकला. पोलीसही याठिकाणी आहेत. मोठा जमाव देखील होता. ती व्यक्तीदेखील या फुटेजमध्ये दिसते. त्यावेळी पोलिसांनही मागे वळून पाहिलं होतं. रवी राणा यांनीही आपल्या घरावर दगडफेक झाल्याचा आरोप केला होता.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

या आंदोलनाप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. घरासमोर बसून राणांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी राणा दाम्पत्यांविरोधात घोषणाबाजी केली होती. आता दगडफेक झाल्याचं स्पष्ट झाल्यानं रवी राणा यांनी केलेला आरोप खरा असल्याचं स्पष्ट होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.