Curfew in Achalpur | अचलपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस, शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढं ढकलल्या; गावात तणावपूर्ण शांतता
अचलपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शासकीय कामानिमित्त, वैद्यकीय कामानिमित्त घराबाहेर जाऊ दिले जात आहे. शाळा, महाविद्याविद्यालयं बंद आहेत. एक ते नवव्या वर्गाच्या परीक्षा पुढं ढककलल्या आहेत.
अमरावती : अचलपूर (Achalpur) येथे झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला. याप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली. ही माहिती अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना (Inspector General of Police Chandrakishore Meena) यांनी दिली. या प्रकरणातील झेंडा लावणारा अभय माथने याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. झेंडा लावणारा भाजपशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. अचलपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शासकीय कामानिमित्त, वैद्यकीय कामानिमित्त घराबाहेर जाऊ दिले जात आहे. शाळा, महाविद्याविद्यालयं बंद आहेत. एक ते नवव्या वर्गाच्या परीक्षा पुढं ढककलल्या आहेत. गावात शांततेसाठी पोलीस रूट मार्च काढण्याची शक्यता आहे. अचलपुरात सहाशे पोलीस तैनात (six hundred policemen in Achalpur) करण्यात आले आहेत. एसआरपीएफलाही पाचारण करण्यात आलंय.
2007 मध्ये सव्वा महिने होती संचारबंदी
अचलपूर शहराला तटबंदी म्हणून पाच-सहा गेट आहेत. दुल्हा गेट ही यापैकीच एक. या गेटवर झेंडा लावण्यावरून हा वाद निर्माण झालाय. तीनशे वर्षांपूर्वी ही गेट बांधण्यात आलीय. इस्माईल खान या सरदारानं ही गेट बांधली. दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडं रस्ता जात असल्यानं गेटचे नाव दुल्हा गेट असं पडलं. यापूर्वी 2007 मध्ये दुर्गा देवीच्या मिरवणुकीवेळी हाणामारी झाली होती. दुकान जाळले होते. सव्वा महिना बंदोबस्त होता. दिवाळी पोलिसांची दिवाळी तिथंच गेली होती. दोन गटांत कधीकधी हाणामाऱ्या होत असतात.
नागरिकांचे पोलिसांना सहकार्य
अचलपूर शहरात कालपासून पोलीस तैनात आहेत. या पोलिसांना नागरिक सहकार्य करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव अचलपुरात तळ ठोकून आहेत. जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकही बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत.
वाद कशावरून झाला
दुल्हा गेटवर झेंडा फडकवल्यावरून वाद झाला होता. एका समुहाचे लोकं झेंडा गाडण्यासाठी आले. दुसऱ्या समुहाच्या लोकांनी त्यांना विरोध केला. यावरून हा वाद झाला. या भागात दगडफेक झाली होती. त्यामुळं दुल्हा गेटसमोर विटांचे तुकडे पडून होते. 18 ते 22 वयोगटातील तरुणांना ताब्यात घेण्याचं काम पोलिसांनी केलंय. गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळं बाहेर पडणाऱ्यांची चौकशी केली जाते.