Amravati Municipal Corporation | अमरावती महापालिकेची अंतीम प्रभाग रचना जाहीर, 33 पैकी 7 प्रभागांचे नाव बदलले
अमरावती मनपाच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी प्रारूप तयार झाले आहे. 17 जागा अनुसूचित जातीसाठी, 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहेत. महिलांसाठी 49 जागा आरक्षित राहणार आहेत. अमरावती शहराची एकूण लोकसंख्या 6 लाख 47 हाजर 57 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीचे 1 लाख 11 हजार 435, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 15 हजार 955 आहे.
अमरावती : अमरावती महापालिकेची अंतिम प्रभाग रचना (Final ward composition) जाहीर जाहीर करण्यात आली. 33 प्रभागांपैकी 7 प्रभागांचे नाव बदलण्यात आले. पूर्वी अमरावती मनपात 22 प्रभाग होते. नवीन रचनेनुसार प्रभागांची संख्या 33 झाली आहे. पूर्वी अमरावती मनपात 87 नगरसेवक (corporator) होते. आता नवीन प्रभाग रचनेनुसार, नगरसेवकांची संख्या 98 होणार आहे. अमरावती मनपात (Amravati Municipal Corporation ) 11 प्रभागांसह 11 नगरसेवक वाढले. मनपाच्या नव्या प्रभाग रचनेवर पाच झोन व मुख्यालयात सुमारे तीनशे हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. आधी चार नगरसेवकांचा एक प्रभाग होता. यावेळी तीन नगरसेवकांचा एक प्रभाग राहणार आहे. तीन नगरसेवकांचे 32 व एक प्रभाग दोन नगरसेवकांचा राहणार आहे. बडनेरा उपनगरातील आठवडी बाजार हा सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग राहणार आहे.
महिलांसाठी 49 जागा आरक्षित
अमरावती मनपाच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी प्रारूप तयार झाले आहे. 17 जागा अनुसूचित जातीसाठी, 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहेत. महिलांसाठी 49 जागा आरक्षित राहणार आहेत. अमरावती शहराची एकूण लोकसंख्या 6 लाख 47 हाजर 57 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीचे 1 लाख 11 हजार 435, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 15 हजार 955 आहे. अमरावती मनपात आधी 87 नगरसेवक निवडून येत आहे. यावेळी नव्या प्रभाग रचनेनुसार ही संख्या वाढणार आहे. त्यामुळं 98 जणांना नगरसेवक होण्याची संख्या मिळणार आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानं उभेच्छुक कामाला लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या कामाचे मार्केटिंग करण्याचं काम सध्या सुरू आहे. या कामाला आता आणखी जोर येणार आहे.
अमरावती मनपाचे पक्षीय बलाबल
भाजप – 45 शिवसेना – 7 काँग्रेस – 15 एमआयएम – 10 बीएसपी – 5 रिपाई (आठवले गट )- 1 स्वाभिमानी पार्टी – 3 अपक्ष – 1
पूर्वीची एकूण संख्या-87