lumpy disease : शेकडो जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात, वाशिम जिल्ह्यात पशुपालक चिंतेत

उत्तर प्रदेशात लम्पी या आजारानं 115 जनावरं दगावली. 17 लाख जनावरांचं लसीकरण करण्यात आलं. याचा धसका राज्यातील पशुसंवर्धन विभागानं घेतला.

lumpy disease : शेकडो जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात, वाशिम जिल्ह्यात पशुपालक चिंतेत
शेकडो जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात,वाशिम जिल्ह्यात पशूपालक चिंतेत
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 9:22 PM

वाशिम : जिल्ह्याच्या वाकद परिसरातील शेकडो जनावरांना लम्पी (lumpy) या संसर्गजन्य रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झालीय. लम्पीनं एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळं पशुपालकांमध्ये (animal husbandry) भीती पसरली आहे. लम्पी आजारावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पशुपालकांनी पशु संवर्धन विभागाकडे केली आहे.रिसोड तालुक्यातील वाकद परिसरातील शेकडो पाळीव जनावरे (animals) लम्पी रोगाच्या विळख्यात सापडली आहेत.या रोगामुळे श्रीराम देशमुख या शेतकऱ्याच्या एका बैलाचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने लम्पी रोगावर प्रभावी उपाययोजना करून पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी श्रीराम देशमुख यांनी केली आहे.

लम्पी संसर्गजन्य आजार

वाकद परिसरातील 24 जनावरे लम्पी या संसर्गजन्य रोगाच्या विळख्यात सापडलीत. यातील एका बैलाचा मृत्यू झाला आहे. लम्पी रोग संसर्गजन्य असल्याने पशुपालकांनी बाधित जनावराला वेगळे ठेवावे. गोठ्याची स्वच्छता,जनावरांची स्वच्छता ठेवावी. आवश्यक त्या फवारण्या कराव्यात असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद वानखेडे यांनी केलं. पशुसंवर्धन विभाग उपाययोजनांसाठी तत्पर आहे.त्यामुळं पशुपालकांनी घाबरून जाऊ नये असंही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विनोद वानखेडे यांनी म्हटंलय.

युपीत लम्पीने घेतला 115 जनावरांचा बळी

लम्पी या आजाराचा प्रभाव राज्यातील 13 जिल्ह्यात पाहायला मिळतो. जळगाव जिल्ह्यात सुरुवातील लागण झाली होती. इतर जिल्ह्यातही त्याचा प्रसार होतोय.लसीकरणाचे औषध उशिरा पोहचलं. त्यामुळं लम्पी आजार वाढण्याचा धोका निर्माण झालाय. राज्यातील पशुवैद्यक सतर्क झाले आहेत. राज्यात लसीकरण करण्यात येतंय. तरीही लम्पी आटोक्यात आणण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागासमोर आहे. उत्तर प्रदेशात लम्पी या आजारानं 115 जनावरं दगावली. 17 लाख जनावरांचं लसीकरण करण्यात आलं. याचा धसका राज्यातील पशुसंवर्धन विभागानं घेतला.

हे सुद्धा वाचा

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....