Video Amravati police : अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचा दारुच्या नशेत धिंगाणा, बस वाहकालाही अश्लील शिवीगाळ

चालकानं गाडी थेट पोलीस ठाण्यात लावली. आपलाच एक सहकारी तर्र असलेला पाहून पोलिसांना विश्वासच बसला नाही. नशेत हा पोलीस सर्वांशीच अहेरावी करत होता.

Video Amravati police : अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचा दारुच्या नशेत धिंगाणा, बस वाहकालाही अश्लील शिवीगाळ
दारुच्या नशेत धिंगाणा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबितImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 5:40 PM

अमरावती : अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याने दारुच्या नशेत धिंगाणा घातला. बस वाहकालाही अश्लील शिवीगाळ केली. अमरावती जिल्ह्यात एसटी बसमध्ये हा प्रकार उघडकीस आला. अमरावती-दर्यापूर (Amravati-Daryapur) मार्गावरील खोलापूरमधील धक्कादायक प्रकारचा व्हिडीओ बाहेर आला. दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई (suspension action) करण्यात आली. मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अक्षय बेलसरे (Akshay Belsare) असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयी नोकरीवर होता. त्याने चालकासोबत वाद घातला होता. एसटी चालकाने थेट बस पोलीस ठाण्यात नेली. पोलीस कर्मचाऱ्याविरोधात विविध गुन्हे दाखल केले. विठाई असं बसचं नाव आहे.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओत काय

अमरावती-दर्यापूर मार्गावरील खोलापूर येथील ही घटना. बस सुरू आहे. या बसमध्ये एक पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आहे. दारुच्या नशेत तो बडबड करत आहे. त्याने प्रवाशांसोबत वाद घातला. माझी चेकिंग कोणी करू शकत नसल्याचा वाद पोलिसाच्या वर्दीत असलेल्या कर्मचाऱ्याने घातला. याचा एसटीतील प्रवाशांना त्रात होत आहे. चालकाला बस थांबवण्यास त्यानं भाग पाडलं. त्यानंतर दुसऱ्या एका कर्मचाऱ्यानं त्याला शांत केलं. पण, तरीही दारुच्या धुंदीत हा पोलीस काही कुणाला जुमानायला खाली नाही. वाहकाशीही या पोलिसानं वाद घातला.

पोलीस कर्मचारी निलंबीत

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याचे होशच उडाले. चालकानं गाडी थेट पोलीस ठाण्यात लावली. आपलाच एक सहकारी तर्र असलेला पाहून पोलिसांना विश्वासच बसला नाही. नशेत हा पोलीस सर्वांशीच अहेरावी करत होता. शेवटी ही बाब वरिष्ठांपर्यंत गेली. वरिष्ठांनी अक्षय बेलसरेला निलंबीत केलं. आता त्याची नशा उतरली आहे. नोकरीवरून निलंबीत झाल्यानं तो सूतासारखा सरळ झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.