या देवीच्या भेटीला निघाले होते महात्मा गांधी, नंतर पाठविलेल्या पत्रात काय?
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेतं महात्मा गांधींना दर्शन घेता आले नाही.
सुरेंद्रकुमार आकोडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव (Anjangaon) दर्यापूर रोडवरील श्री मुऱ्हा देवी संस्थान येथे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोल्हापूर येथील अंबाबाई आणि श्रीक्षेत्र मुऱ्हा येथील एकवीरा देवी या मूर्तीमध्ये अनेक साम्य असल्याची माहिती येथील विश्वस्त देतात. श्री क्षेत्र मुऱ्हा देवी (Murha Devi) येथील एकवीरा देवीची मूर्ती हे 8०० वर्षे जुनी आहे. काही वर्षांपूर्वी या देवीला पुरातत्व विभागाच्या (Department of Archaeology) मार्गदर्शनात वज्रलेप करण्यात आला. तेव्हा कोल्हापूरची अंबाबाई आणि मुऱ्हाची एकवीरा माता यांच्या मूर्तीत अनेक साम्य असल्याचे समोर आले.
याच एकवीरा देवीच्या भेटीला महात्मा गांधीसुद्धा दिल्लीवरून अमरावती निघाले होते. अमरावतीवरून अंजनगावच्या दिशेने रवाना झाले. मार्गातच प्रचंड मुसळधार पाऊस आला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेतं महात्मा गांधींना दर्शन घेता आले नाही. देवीचे दर्शन न घेताच महात्मा गांधी आल्यापावली परत गेले.
महात्मा गांधींनी पाठवले पत्र
29 डिसेंबर 1933 च्या पत्रात गांधीजी लिहतात, ‘मुझे दुःख है की मै अंजनगाव गया तो भी जिस मंदिर के हरिजनो के लिये खुलने पर मैने धन्यता का यह तार पुणे से किया था। उसके दर्शन के लिये मैं नही जा सका.
मेरी उम्मीद है की हरिजन भाई, बहन मंदिर का उपयोग करते है और उनके उपयोग से दुसरे हिंदू वहा जाने से हिचकते नही होंगे. मेरी यह भी उम्मीद है की तुलसाबाई ने जो जमीन दी है. उसका भी सही उपयोग हरिजनो के लिये होता होगा.
अशी माहिती मुऱ्हा देवी संस्थानचे विश्वस्त साहेबराव पखान यांनी दिली.