रवी राणा यांची जेलवारी टळली, आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

अमरावती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या वरील शाई फेक प्रकरणात रवी राणा यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रवी राणांची जामीनासाठी धावाधाव सुरू होती.

रवी राणा यांची जेलवारी टळली, आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
रवी राणा यांना जामीन मंजूरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 5:59 PM

स्वप्निल उमप, प्रतिनिधी, अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीतल्या पुतळ्याचा (Shivaji Mahraj) वाद राज्यभर गाजतोय. महापालिकेने परवानगी न घेता बसवलेला पुतळा हटवला त्यानंतर याच वादातून महापालिका आयुक्त आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्यावर शाईफेक झाली आणि रवी राणांच्या (Ravi Rana) अडचणीत वाढ झाली होती. मात्र आता राणांना या प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे. अमरावती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या वरील शाई फेक प्रकरणात रवी राणा यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रवी राणांची जामीनासाठी धावाधाव सुरू होती. रवी राणा यांच्या अटकेची शक्यताही वर्तवण्यात आली होती. मात्र कोर्टाने त्यांना काही दिवस अटकेपासून संरक्षण दिलं होतं. त्यानंतर राणांच्या जामीनासाठी हलचाली वाढवल्या होत्या.

राज्य सरकारवर राणा यांचे आरोप

पोलिसांची ही कारवाई राज्य सरकार सुडाच्या भावनेतून करत असल्याचा आरोप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. आज अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचा जमिनावर अंतिम निर्णय झाला आहे. शाईफेक प्रकणात आमदार रवी राणा यांच्यावर 307 चा गंभीर गुन्हा दाखल आहे. काल तब्बल अडीच तास जामिनावर युक्तिवाद झाला. हा हल्ला 9 फेब्रुवारीला झाला होता. त्यानंतर आज राणा यांना जामीन मंजूर झाल्याची वकील दीप मिश्रा यांनी माहिती दिली. या प्रकणाची चर्चा राज्यभर झाली होती. या भाजपही राणा यांच्या समर्थनात राज्य सरकारवर टीका करत होते.

नवनीत राणा यांचाही वाद

या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी अटकेतील आरोपींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. या प्रकरणातील काही आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आरोपींना भेटण्यासाठी नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची महिला पोलीस अधिकाऱ्याशी चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या. रवी राणा यांच्या अटकपूर्व जामीना संदर्भात न्यायालयाने काही अटी दिलेल्या आहेत. रवी राणा यांना वेळोवेळी पोलीसांना चौकशीसाठी सहकार्य करावे लागेल. पोलिसांना जर रवी राणा यांना चौकशीला बोलवायचे असेल तर त्यांना आधी लेखी स्वरूपात नोटीस द्यावी लागेल. तसेच साक्षीदारांवर दबाव आणता येणार नाही. असे कोर्टाने सांगितले आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं, महाजनांनी सांगितला पुन्हा पालिका जिंकण्याचा प्लॅन

मेट्रो कारशेडची नवी जागा लवकरच घोषित करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, वाद संपणार?

VIDEO: राणे पिता पुत्रांची मुंबईत पोलीस ठाण्यात हजेरी, फडणवीस न बोलता का निघून गेले?

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....