“उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी प्रेम”; भाजप नेत्याने हिंदुत्वाचा सूर पुन्हा आळवला…

महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस पक्ष आहे मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे एक तर तुम्ही त्यातून बाहेर पडा नाहीतर काँग्रेसला तरी बाहेर काढा अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी प्रेम; भाजप नेत्याने हिंदुत्वाचा सूर पुन्हा आळवला...
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 7:17 PM

अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावची सभा झाल्यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राहुल गांधी यांच्यावरून जोरदार राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही अशा शब्दात त्यांना सांगितल्यानंतर आता त्यावरून भाजपने आणि शिवसेनेने राजकारण सुरु केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावरकरांच्या मुद्यावरून राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्ष सत्तेचा उपभोग घेताना उद्धव ठाकरे यांना हे सुचलं नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्त्यव्य केल्यानंतर भाजप आणि आता ठाकरे गटामध्ये जोरदार राजकारण सुरू झाले आहे.

याबद्दल बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल सातत्याने अपमान होत आहे. मात्र त्यावेळी ठाकरे गटाकडून अवाक्षरही काढण्याता आले नाही.

मात्र त्याच क्षणी उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होते मात्र तसे झाले नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. ज्याकाळात टीका केली जात होती.

त्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणाऱ्यांचा ठाकरे सरकार सत्कार करण्यात गुंतले होते असा घणाघातही यावेळी करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताच आता भाजपने याच संधीचा फायदा घेत. त्यांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली. राणा दांपत्यावर कारवाई करण्यात आल्यावरूनही त्यांनी त्यांच्यावर टीका करण्यात आली.

देवभक्ती आणि देशभक्ती करणाऱ्या लोकांवर तुमच्या काळात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा त्यांनी समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व हे बेगडी प्रेम आहे. त्यांनी भाजपच्या पाठीत सत्तेसाठी खंजीर खुपसला असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर करण्यात आली आहे. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श वाटू लागले असल्याचा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस पक्ष आहे मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे एक तर तुम्ही त्यातून बाहेर पडा नाहीतर काँग्रेसला तरी बाहेर काढा अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

तुम्हाला फक्त सत्तेसाठी फक्त हिंदुत्व पाहिजे मात्र आता हिंदुत्वाचा अधिकार तुम्ही गमावला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.