AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati | पलंग-गादी पाठवतो आराम करा नि राजीनामा द्या, भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांची नवाब मलिकांवर टीका

अमरावतीमध्ये भाजप नेते डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी नवाब मालिकांना पलंग व गाडी पाठवून आपण जेलमध्येच आराम करावा. आपला राजीनामा मुख्यमंत्र्याकडे पाठवून द्यावा, असे म्हणत आंदोलन केले.

Amravati | पलंग-गादी पाठवतो आराम करा नि राजीनामा द्या, भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांची नवाब मलिकांवर टीका
अमरावतीत अनोखे आंदोलन करताना डॉ. अनिल बोंडे.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 12:27 PM
Share

अमरावती : मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांनी न्यायालयामध्ये पाठीचा त्रास असल्यामुळे पलंग, गादी व घरून जेवणाचा डबा मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्याचा अर्ज मान्य केला आहे. त्यांना पलंग वापरण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यातच अमरावतीमध्ये भाजप नेते डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी नवाब मालिकांना पलंग व गाडी पाठवून आपण जेलमध्येच आराम करावा. आपला राजीनामा मुख्यमंत्र्याकडे पाठवून द्यावा, असे म्हणत आंदोलन केले. देशद्रोही असलेल्या दाउद इब्राहीम सोबत संबंध असलेल्या मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) टेरर फंडिंगमध्ये नाव आल्यामुळे त्यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अल्पसंख्याक मंत्री पदाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

नवाब मलिकांचा मुक्काम वाढणार

कौशल्य विकास मंत्रीपदाचा कारभार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परभणीचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. शरद पवार यांना माहिती आहे की, नवाब मलिक यांचा जेलमधील मुकाम प्रदीर्घ आहे. म्हणून त्यांच्याकडील सर्व मंत्री पद व राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्षपद सुद्धा काढून घेतले. शरद पवार वापरून घेतात व सोडून देतात, असा आरोप माजी मंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

अनिल बोंडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन

भारतीय जनता पक्ष अमरावतीतर्फे भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृवात मंत्री नवाब मलिक यांना पलंग, गादी व उशी पाठवली. राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत देहनकर, गजानन देशमुख, ललित समदुरकर, प्रशांत शेगोकार, राहुल जाधव, दिलीप कारुले, विजय चीलातरे, गोवर्धन सगणे, ज्ञानेश्वर तेलखेडे, दीपक अनासाने, नरेंद्र राऊत, म्हस्केंसह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrapur | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा, बँकेच्या सीबीआय चौकशीची मागणी, पालकमंत्री वडेट्टीवार-खासदार धानोरकर समोरासमोर

ठाकरे सरकारमध्ये मतभेद आहेत काय?, Sanjay Raut यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; नेमकं काय म्हणाले?

BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?; संजय राऊतांचा सवाल

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.