Tiger Gava Clash : ह्या एका ‘झुंजी’पुढे सगळ्या ‘फाईल्स’ फिक्या, मेळघाटची ही ‘झूंड’ पाहिलात का?
समाज माध्यमांवर (Social media) प्राण्यांचे (Animals) व्हिडिओ (Video) सर्वाधिक आवडीने पाहिले जातात. अमरावतीच्या (Amravati) मेळघाट (Melghat) परिसरातील हा व्हिडिओ आहे. वाघ आणि गव्याची झुंज येथे पाहायला मिळाली. थरारक असा हा व्हिडिओ आहे.
अमरावती : समाज माध्यमांवर (Social media) प्राण्यांचे (Animals) व्हिडिओ (Video) सर्वाधिक आवडीने पाहिले जातात. जंगली प्राणी आणि त्यांचे जंगलातले कारनामे आपण केवळ ऑनलाइनच पाहू शकतो. कारण एक तर ते अत्यंत धोकादायक आणि जीवघेणे प्राणी असतात. जरी आपल्याला त्यांना पाहायची इच्छा झालीच तरी आपण केवळ प्राणीसंग्रहालयातच त्यांना पाहू शकतो. प्रत्यक्षात पाहण्याचे धाडस जीवघेणे ठरू शकते. मात्र सध्या या जंगली प्राण्यांचा एक कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ही झुंज खरे तर झूंड म्हणायला हवी. अशाप्रकारे चवताळलेल्या प्राण्यांच्या जवळ जाणे खरे तर धोकादायक आहे. मात्र सुरक्षा साधनांचा वापर करून तो कॅमेऱ्यात टिपण्यात आल्याचे वाटते. अमरावतीच्या (Amravati) मेळघाट (Melghat) परिसरातील हा व्हिडिओ आहे. थरारक असा हा व्हिडिओ आहे.
समाज माध्यमांवर तुफान व्हायरल
जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम भागात सध्या मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढली असल्याचे दावे करण्यात येत आहेत. इतर अभयारण्याप्रमाणेच मेळघाटातसुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने वाघ पाहण्यासाठी येत असतात. मात्र काल पर्यटकांना वाघ आणि गव्याची झुंज पाहायला मिळाली असून हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मेळघाटातील सेमाडोह येथील असल्याची माहिती वसा संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री. भगते यांनी दिली आहे.
Tiger Gava Clash : ह्या एका ‘झुंजी’पुढे सगळ्या ‘फाईल्स’ फिक्या, मेळघाटची ही ‘झूंड’ पाहिलात का?#amravati #animals #Tigers #gava #wild #VideoViral #Trending #viral #SocialMedia अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/JJfGylKaBr
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
वाघच राजा
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, तीन गवे आपल्याला दिसत आहेत. तर वाघही त्यांच्यासमोर आहे. वाघाला सर्व प्राणी घाबरतात, हे या व्हिडिओतही दिसून येईल. एका गव्याला वाघाने आपल्या जबड्यात पकडले आहे. मात्र इतर गव्यांची आपल्या सहकाऱ्याला सोडण्याची हिंमत होत नाही, असा हा आश्चर्यकारक व्हिडिओ आहे. वाघाच्या हल्ल्याने गवा मात्र जबर जखमी झाल्याचे दिसते.