पश्चिम विदर्भात यंदाही पाणी टंचाईची शक्यता, धरणात उरलंय फक्त एवढंच पाणी…
कारण विदर्भातील धरणात (Dam) मुबलक पाणीसाठी उपलब्ध नाही. याचा फटका पिकांना तर बसण्याची शक्यता आहेच, मात्र उन्हाळ्यात विदर्भाला पिण्याच्या पाण्याासाठी जी पायपीट करावी लागते, त्याचीही शक्यता जास्त आहे.
अमरावीत :उन्हाळ्याच्या (Summer) दिवसात विदर्भाला (Vidarbha Water Issue) दरवर्षी पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यंदाची अशीच काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण विदर्भातील धरणात (Dam) मुबलक पाणीसाठी उपलब्ध नाही. याचा फटका पिकांना तर बसण्याची शक्यता आहेच, मात्र उन्हाळ्यात विदर्भाला पिण्याच्या पाण्याासाठी जी पायपीट करावी लागते, त्याचीही शक्यता जास्त आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येते. हे टाळायचे असेल तर धरणात जो पाणीसाठी आहे. त्याचे योग्य नियोजन करणे आणि शिल्लक पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे. पश्चिम विदर्भात एकूण 511 प्रकल्प आहेत. त्यापैकी 9 मोठे प्रकल्प आहेत. तर मध्यम 25 प्रकल्प आहेत. सर्वाधिक लघु प्रकल्प म्हणजे 477 आहेत. पश्चिम विदर्भातील 511 प्रकल्पांमध्ये 64.71% सध्या जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे विदर्भाची चिंता वाढली आहे.
विदर्भातील जिल्ह्यानुसार पाणीसाठा
पाणीसाठी झपाट्याने घटतोय
फेब्रुवारी महिना संपत असताना प्रकल्पामधील पाण्याच्या स्थितीत घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात पश्चिम विदर्भात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज दिसून येतोय. गेल्या काळात उन्हाळ्यामध्ये पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं होतं. या वर्षी देखील तीच परिस्थिती उद्भवू शकते असं सध्याच्या प्रकल्पातील पाणीसाठा वरून दिसतय. सध्या पश्चिम विदर्भातील 9 मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा घटताना दिसतोय. त्यामुळे येत्या काळात पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
पाणी जपून वापरा
पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाचा व मोठ समजले जाणारे अप्पर वर्धा धरणात केवळ 68.98% जलसाठा आहे. सिंचन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून पाणीटंचाईची आकडेवाडी देण्यात आली आहे. त्यामुळी आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळायची असले. विदर्भात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण टाळायची असेल तर आत्तापासून पाण्याचा वापर जपून होणे गरजेचे आहे. अन्यथा दरवर्षीप्रमाणे यंदाही तीच वेळ येऊ शकते. विदर्भातल्या पाणीटंचाईचा सर्वात जास्त फटका हा विदर्भातील शेतकऱ्यांना बसतो.
पहिला मान उस्मानाबादला : शेतकऱ्यांची चार महिन्यांची प्रतिक्षा संपली, आता थेट बॅंक खाते चेक करा..!
Latur Market : सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती, काय आहे बाजारपेठेतले चित्र?
लेट पण थेट : द्राक्ष निर्यात जोमात, रशिया-युक्रेन युध्दाचा निर्यातीवर काय परिणाम? वाचा सविस्तर