Marathi News Maharashtra Amravati Yashomati thakurs suggestive tweet against central government common man on gas the housewifes financial budget collapsed au128
Yashomati Thakur | यशोमती ठाकूर यांचे केंद्र सरकारविरोधात सूचक ट्विट, सामान्य माणूस गॅसवर! गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले
घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. इथून पुढे एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
यशोमती ठाकूर यांचे केंद्र सरकारविरोधात सूचक ट्विटImage Credit source: twitter
अमरावती : देशातील वाढत्या महागाई (Inflation) वर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर प्रतिक्रिया व्यक्त करीत केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. त्यांनी सामान्य माणूस गॅसवर! पन्नास रुपयांची वाढ ही काही सामान्य वाढ नव्हे. मोदी सरकार जनतेकडून पैसे लुटून आपले ‘ग्राफ’ नीट करायच्या मागे लागले आहेत, अशा आशयाचे सूचक ट्विट करीत सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. देशात पेट्रोल डिझेलसह (increase in petrol, diesel prices ) अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी भाववाढ (increase in prices of essential commodities) झाली आहे. आधीच लॉकडाउननंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले. असे असताना आता केंद्रातील सरकारने महागाईचा आणखी एक धक्का दिला. त्यामुळं सामान्य माणूस गॅसवर गेला आहे.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 7, 2022
सिलिंडरच्या दरात वाढ
घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. इथून पुढे एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडर महागल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळं महागाई वाढली आहे. याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. इंधनाच्या दरात झालेली ही भाववाढ महागाई वाढविणारी आहे.
सिलिंडर दरवाढ आजपासून लागू
घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली. दिल्लीत सिलिंडर एक हजार रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी 50 रुपये वाढ करण्यात आली होती. म्हणजे महिन्याभरात 100 रुपयांची वाढ घरगुती गॅस सिलिंडरवर करण्यात आली. यामुळं सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. महिलांचे घरगुती बजेट कोसळले आहे. यावर काँग्रेसने कडाडून टीका केली.