आज फिर एक बिल्लीने, राऊतांच्या ग्रँड प्रेस कॉन्फरन्सवर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!
शिवसेनेचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या बिल्ली असं संबोधलं. त्यामुळे हा अपमान शिवसेनाचा जिव्हारी लागणार असं दिसतंय. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आता शिवसेना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुंबईतील शिवसेना भवन येथून पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. ईडीच्या माध्यमातून भाजपने महाराष्ट्र सरकारमधील नेते आणि मंत्र्यांना जेरीस आणल्याचा आरोप केला. पण आम्हीही शिवसेनेचे वाघ आहोत, बाळासाहेबांची प्रेरणा आमच्यामागे आहे. आम्ही आधीही म्हटलं त्याप्रमाणे हम डरेंगे नही.. झुकेंगे नही, तेव्हा हे घाबरवणारे कुठे असतील, ते बघून घेऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. यावर भाजपच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvees) यांनीदेखील राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर पहिली प्रतिक्रिया दिली.
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !#Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 15, 2022
अमृता फडणवीस यांचं ट्वीट काय?
अमृता फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांना टोमणा मारला. आज फिर एक बिल्लीने दहाडनेही कोशिश की है… असं सूचक वक्तव्य त्यांनी ट्वीटरद्वारे केलं. त्यांच्या या ट्वीटची प्रचंड चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि एकूणच राज्यभरातील लोकांमध्ये होऊ लागली आहे. शिवसेनाचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना अशा प्रकारे बिल्ली संबोधल्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ट्वीट केल्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या ट्वीटला हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट आल्या.
शिवसेनेच्या जिव्हारी लागणार?
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता केलेल्या ट्वीटवर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहे. शिवसेनेचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या बिल्ली असं संबोधलं. त्यामुळे हा अपमान शिवसेनाचा जिव्हारी लागणार असं दिसतंय. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आता शिवसेना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या-