सुपारी घेतल्याशिवाय मनसे कामच करू शकत नाही, त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून; अनिल परब यांचा घणाघात

सुपारी घेतल्याशिवाय मनसे (MNS) कोणतंही काम करू शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी मनसेवर टीका केली आहे.

सुपारी घेतल्याशिवाय मनसे कामच करू शकत नाही, त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून; अनिल परब यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 6:19 PM

मुंबई : शिवसेना प्रवक्ते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सुपारी घेतल्याशिवाय मनसे (MNS) कोणतंही काम करू शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी मनसेवर टीका केली आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झालीच आहे. ज्या भाजप नेत्यांना लोकसभा नुवडणुकीत ‘लाव रे तो व्हडिओ’ दाखवून उघडं नागडं केलं. त्यांच्यासोबतच उघडे झोपले की काय परिस्थिती होते ते पुढे दिसेल असा घणाघात अनिल परब यांनी केला आहे. (Anil Parab criticized on mns and bjp also taunt to gopichand padalkar)

यावेळी बोलताना अनिल परब यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत भाजपवरही टीका केली आहे. सरकार जाईल ही स्वप्न बघतच भाजपला पाच वर्षे काढायची आहेत. पाचव्या वर्षी पुन्हा त्यांचा स्वप्नभंग होणार असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. सत्तेविना ते अस्वस्थ झालेत. कार्यकर्ते बिथरून कुठे जाऊ नयेत म्हणून हे त्यांना बोलावं लागतं असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

‘कोरोना रोखण्यासाठी सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील’ कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पुन्हा लॉकडाऊन करावं या मताचं सरकार नाही. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल तर सरकारला काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. समजा लाट आलीच तर सरकारची तयारी आहे. रुग्ण संख्या कमी असली तरी सध्या हॉस्पिटल्स बंद न करण्याचा सूचना दिल्या आहेत. दळणवळणाच्या साधनांवर निर्बंध घालण्याबाबत पुढच्या 10 ते 15 दिवसांत आकडेवारी पाहून निर्णय घेतला जाईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

पडळकरांवर टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही केलेल्या वक्तव्यावरही अनिल परब यांनी पडळकरांची शाळा घेतली आहे. ‘शरद पवार कुठे, त्यांचं कर्तृत्व कुठे आणि पडळकर कुठे. कोणावरही टीका करण्याआधी स्वतःकडे पहावं. वयाच्या 36 व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. हे असे बोलणारे भाजपच्या संस्कारातले नाही. ही भेसळ आहे. ओरिजिनल भाजपमधील असे बोलणार नाहीत’ अशी टाकी अनिल परब यांनी केली.

इतर बातम्या – 

जसे आम्ही 105 आमदारांवर भारी; तसे चार खासदार 303 वर भारी, पवारांना डिवचणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचे उत्तर

Gopichand Padalkar | शरद पवारांबद्दलच्या वक्तव्य वादात भाजप नेते गोपीचंद पडळकरांची उडी

(Anil Parab criticized on mns and bjp also taunt to gopichand padalkar)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.