Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; मोठी बातमी समोर
anil parab
Follow us
| Updated on: Mar 27, 2025 | 3:20 PM

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारकडून अनिल परब यांच्याभोवती फास आवळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी होणार आहे. परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खरमाटे यांच्यावर आहे. या प्रकरणात आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

नेमका काय आहे आरोप?

सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खरमाटे यांच्यावर आहे. मागच्या तीन महिन्यांत हॉटेल्समध्ये परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा त्यांचावर आरोप आहे. याबाबत आता मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरमाटे आणि अनिल परब यांच्या आर्थिक संबंधांची चौकशी विविध तपास यंत्रणेकडून सुरु आहे. त्यातच आता EOW च्या चौकशीची देखील भर पडली आहे.

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरमाटे यांची चौकशी केली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांच्या नागपूर येथील घरी छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांना समन्स बजावून मुंबईत चौकशीसाठी बोलावण्यात आले, जिथे 8 तासांहून अधिक काळ त्यांची कसून चौकशी झाली. त्यांच्या मोबाइलचीही तपासणी करण्यात आली होती. अनिल देशमुख प्रकरणातही खरमाटे यांचं नाव समोर आलं होतं.

आयकर विभागाने खरमाटे यांच्या संपत्तीवर छापे टाकले असून, त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत असलेली प्रचंड संपत्ती उघड झाली आहे. यातून त्यांच्यावर बेनामी मालमत्तांचा संशय वाढला.

नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी खरमाटे यांच्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी करण्याची शिफारस केली होती. राज्य सरकारने लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.