Anna Bhau Sathe: अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित करा; साहित्यिक,कलावंत,सांस्कृतिक, सामाजिक संघटनांची मागणी

अण्णा भाऊ साठे फक्त केवळ लेखक, कलावंत नव्हते, तर ते प्रत्यक्ष येथील दलित-शोषित, कामगार, शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत, स्वातंत्र्य चळवळीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, गोवा मुक्ती आंदोलनत सक्रिय सहभागी होते, तुरूंगवासही भोगला होता.

Anna Bhau Sathe: अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित करा; साहित्यिक,कलावंत,सांस्कृतिक, सामाजिक संघटनांची मागणी
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 7:57 AM

मुंबईः देशात 5 सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (Teacher Day) म्हणून साजरा केला जातो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. 11 नोव्हेंबर हा मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. तर 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. दि. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो.. तसेच रामानुजन यांचा जन्म दिवस गणित दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच प्रणाणे लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांचा 1 ऑगस्ट (1 August) रोजी जन्म दिन असतो, त्यानिमित्ताने त्यांचा जन्मदिन हा लेखन प्रेरणा दिन म्हणून शासनाने घोषित करावा अशी मागणी साहित्यिक, कलावंत, सांस्कृतिक, सामाजिक संघटनांनी मागणी करण्यात आली आहे.

अशा या महान व्यक्तींचा त्या- त्या दिवशी जीवन व कार्याचा आढावा घेतला जातो. त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांच्या आधारे शाळा, महाविद्यालयात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने विद्यार्थी त्या महापुरुषांच्या आयुष्यातील विविध घटना आणि कार्य या विषयाची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. एकूणच त्या महापुरुषांच्या जीवन व कार्याची उजळणी होते त्यानिमित्ताने त्यांच्यावरील पुस्तकांचे वाचन केले जाते.

एकच दिवस शाळेत गेले होते परंतु…

लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे फक्त एकच दिवस शाळेत गेले होते परंतु त्यांनी मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणाने इतिहास घडवला.” दलित साहित्या”चा पाया रचण्यात कॉ. अण्णा भाऊ साठे यांचे मोलाचे योगदान होते.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लेखन केले. कथा,कादंबरी,नाटक, पोवाडा लावण्या, चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. अण्णा भाऊ साठे यांनी कलावंत म्हणून लोकनाट्य, नाटक, चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या, ते अष्टपैलू साहित्यिक,कलावंत होते. “इंडियन पिपल्स थियेटर असोसिएशन “(इप्टा),या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्य संस्थेचे ते अखिल भारतीय अध्यक्षही होते. त्याकाळात त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, सूप्रसिध्द नाट्य सिने कलावंत बलराज सहानी आदी. कार्य करीत असत.

अनेक चळवळींबरोबर जोडले गेले

अण्णा भाऊ साठे फक्त केवळ लेखक, कलावंत नव्हते, तर ते प्रत्यक्ष येथील दलित-शोषित, कामगार, शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत, स्वातंत्र्य चळवळीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, गोवा मुक्ती आंदोलनत सक्रिय सहभागी होते, तुरूंगवासही भोगला होता.

लोकनाट्यातून महाराष्ट्रच नव्हे तर देश ढवळून काढला

कम्युनिस्ट पक्षाच्या “लाल बावटा कला पथका” द्वारे अण्णा भाऊ साठे, शाहीर कॉ. अमर शेख,शाहीर कॉ. दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने त्यांनी आपल्या गाणी, पोवाडे, लोकनाट्यातून महाराष्ट्रच नव्हे तर देश ढवळून काढला व प्रचंड जन जागृती करून मोठे योगदान दिले.

अनेक भाषांमधून साहित्याचा अनुवाद

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध विद्यापीठातील तरुण संशोधक आज अण्णा भाऊंच्या साहित्य, कर्तृत्त्वावर अभ्यास, संशोधन करीत आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या हयातीतच त्यांच्या साहित्याचे, पोवाड्यांचे भारतातील विविध भाषांत अनुवाद झाले आहेत. एवढेच नव्हे तर इंग्रजी, रशियन, झेक, पोलीश, जर्मन, फ्रेंच आदी. भाषांतही अनुवाद होऊन ते जगभर गेले आहे. सातासमुद्रा पार अण्णाभाऊ आपल्या साहित्याने तळपत आहेत.

शासनाच्यावतीने अधिकृतपणे घोषित करा

महाराष्ट्र राज्याने  1 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस देशभर लेखन प्रेरणा दिन म्हणून शाळा, महाविद्यालयांमध्ये साजरा करावा, असे आम्हाला वाटत आहे. आणि याचा प्रारंभ महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन करावा कारण कॉ. अण्णा भाऊ साठे महाराष्ट्रात जन्मले होते. 18 जुलै अण्णा भाऊ साठे यांचा स्मृती दिन होता, त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, सांस्कृतिक, सामाजिक संघटना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केले आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत आहोत की येणारा 1 ऑगस्ट हा अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस, जयंती आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी 1 ऑगस्ट हा ” लेखन प्रेरणा दिन ” म्हणून शासनाच्यावतीने अधिकृतपणे घोषित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये अर्जुन डांगळे, डॉ. बाबुराव गुरव, उर्मिला पवार, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ यशवंत मनोहर, हिरा बनसोडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. भारत पाटणकर, गणेश विसपुते, शाम गायकवाड, सुबोध मोरे, संध्या नरे पवार, डॉ. प्रज्ञा दया पवार, प्रतिमा जोशी, रझिया पटेल, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अजीज नदाफ, राकेश वानखेडे, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. माया पंडित, डॉ. मेधा पानसरे, विश्वास पाटील, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, नीरजा, शफाअत खान, सदानंद देशमुख, महेश केळुस्कर, किशोर कदम, अरूण म्हात्रे, सुदाम राठोड, सत्यपाल रजपूत, निशा शेंडे, राहुल कोसंबी, डॉ. दीपक बोरगावे, सारिका उबाळे, आनंद विंगकर, सायमन मार्टिन, शाहीर संभाजी भगत,मंगेश काळे, प्रा.आशालता कांबळे,छाया कोरेगावकर,कॉ. प्रकाश रेड्डी, डॉ. श्रीधर पवार, प्रा. रमेश कांबळे, डॉ. अनिल सकपाळ, अविनाश गायकवाड, डॉ. श्यामल गरुड, अभय कांता, येशू पाटील, इग्नेशिअस डायस, फिलिप डिसोझा, जयप्रकाश सावंत, राजन बावडेकर, सुरेश राघव, सुभाष थोरात, डॉ. मनोहर जाधव, कविता मोरवणकर, प्रकाश घोडके, संतोष पवार, गोविंद गायकी, प्रभू राजगडकर, मिलिंद किर्ती, लोकनाथ यशवंत पार्थ पोळके, डॉ. उदय नारकर, सुनील अवचार, किरण मोघे, लता भिसे, संपत देसाई, डॉ. आदिनाथ इंगोले, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ.महेबूब सय्यद, डॉ. माधव सरकुंडे, उषा अत्राम, डॉ. कुंदा प्र.नी. प्रा. शोभा बागुल, अविनाश उषा वसंत, साहिल कबीर, डॉ. मारूती कसाब, डॉ. रणधीर शिंदे, प्रा.प्रकाश नाईक, राजीव देशपांडे, अर्जुन जगधने, अंकूश कदम, श्रीधर चैतन्य, शंकर बळी, युवराज बावा, शैलेंद्र कांबळे, सुनील कदम, दीपक पवार, राजानंद सुराडकर, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, लोक सांस्कृतिक मंच, प्रगतिशील लेखक संघ, जनवादी लेखक संघ, दलित पँथर सुवर्णमहोत्सव समिती,जाती अंत संघर्ष समिति, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.