अण्णा हजारे कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत, जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार?

जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी अण्णा हजारे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. त्यांच्या या टीकेला आता हजारे यांनी उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे अण्णा हजारे आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत देखील आहेत.

अण्णा हजारे कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत, जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार?
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 9:02 PM

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांचं आक्रमक होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करत टीका केली. या माणसाने देशाचं वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला आता अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना मोठा इशारा दिलाय.

अण्णा हजारे आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या भांडणाला इतिहास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2011 मध्ये एका तरुणाने थप्पड मारली होती. त्यावेळी अण्णा हजारे यांना पत्रकारांनी तरुणाच्या या कृत्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर अण्णा हजारे यांनी ‘एक ही थप्पड?’, असा प्रतिसवाल करत या घटनेचं समर्थन केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अण्णा हजारे यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली होती. जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विटरवर अण्णा हजारेंवर टीका केली.  त्यावर आता अण्णा यांनी उत्तर दिलंय.

अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?

माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे काय कायदे केले त्या कायद्याचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं, माझ्या काही आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.

अण्णा हजारे यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती दिली. “आम्ही वकिलाचा सल्ला घेऊ. हे ज्याने म्हटलं, वाटोळं केलं, त्याच्यावर अब्रुनुकसान भरपाईचा दावा लावता येईल का, कुठे-कुठे लावता येईल, कसा लवता येईल याची चौकशी करुन, योग्य तो निर्णय घेऊ”, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.