Aryan Khan Bail | मोठी बातमी ! आर्यन खानच्या जामिनावरची आजची सुनावणी स्थगित, उद्या पुन्हा युक्तिवाद होणार
युक्तिवाद सुरू असल्याने न्यायाधीशांनी आज काही सांगितलं नाही. उद्या 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावरील आजच्या (Aryan Khan Bail) सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या जामीन अर्जावर युक्तिवाद होईल. आज दिवसभरात फक्त आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी बाजू मांडली. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे.
आर्यन खानच्या वतीने मुकूल रोहतगी यांचा युक्तीवाद
क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असेलल्या आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्च केलेला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी मांडली.
जामीन अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी
न्यायालयाने रोहतगी तसेच एनसीबीच्या वकिलांची बाजू ऐकूण घेतली आहे. आज कोर्टात फक्त युक्तिवाद झाला आहे. त्यामुळे आजची सुनावणी स्थगित करण्यात आली. तसेच उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जाईल. त्यामुळे उद्या न्यायालयात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज फक्त एका बाजूने युक्तिवाद
कोर्टाने आजची सुनावणी थांबवल्यानंतर कोर्टात नेमकं काय घडलं याची माहिती वकिलांनी दिली. आज फक्त युक्तिवाद झाले. आज एका बाजूने युक्तिवाद झाला आहे. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे. युक्तिवाद सुरू असल्याने न्यायाधीशांनी आज काहीही सांगितलं नाही. उद्या 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, असं आज वकिलांनी सांगितलं.
आज कोर्टात नेमकं काय घडलं ?
आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. क्रुझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असं रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं.
ऑनलाईन गेमिंगची चर्चा
आर्यन खानचा संबंध फारतर अरबाज मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी जोडला जाऊ शकतो. पण यातील अचित कुमार हा क्रूझवर नव्हता. त्याला घरून अटक करण्यात आली आहे. आर्यन तसेच अचित यांच्यात ऑनलाईन गेमिंगसंदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चॅटिंग 12 ते 14 महिन्यांपूर्वी झाली आहे, असा दावा रोहतगी आणि आणि अमित देसाई यांनी केला.
पंचनामाच वाचून दाखवला
मुकूल रोहतगी यांनी कोर्टात पंचनामा वाचून दाखवला. आर्यन खानवर NDPS च्या 8(c), 20b, 27 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलामंर्गत गुन्हा सिद्ध झाला तर कमाल 1 वर्षाची शिक्षा दिली जाते. कोर्टाने रोहतगी यांना आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काय संबंध आहे?, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आर्यन खानची चॅटिंग ही सगळी क्रूझ पार्टीच्या आधीची असल्याचा दावा रोहतगी यांनी केला.
इतर बातम्या :
मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी
Bombay High Court to continue hearing the bail applications of Aryan Khan Arbaaz Merchant and Munmun Dhamecha tomorrow 27 october