Monsoon : दिलासा…! ‘असानी’चक्रीवादळाचा मान्सूनवर तीळमात्र परिणाम नाही, सुरवात सामान्य अंतिम टप्प्यात जोरात ‘बॅटींग’
देशात मान्सूनची सुरवात ही केरळातूनच होते. यंदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 अर्थात बुधवारीच मान्सून केरळात दाखल होत आहे. नियमित वेळीच त्याचे आगमन होणार असून महाराष्ट्रात आगमन होण्यासाठी बराच आवधी आहे. त्यामुळेच सध्याच्या चक्रीवादळाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही.
मुंबई : ज्याप्रमाणे बळीराजाला (Kharif Season) खरीप हंगामाचे वेध लागले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येकाला यंदा (Monsoon) मान्सूनचे चित्र काय राहणार याची उत्सुकता लागलेली आहे. त्याअनुशंगाने (IMD) भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला असला तरी लहान-मोठ्या घटनांमुळे मान्सूनवर काय परिणाम होणार का याची चिंता सर्वांनाच असते. सध्या बंगालच्या उपसागरात ‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तर या वादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान तज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. तर मान्सूनचा सुरवात सर्वसाधारण राहिली तरी अंतिम टप्प्याच अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
IND Bulletin No 20: Latest graphics related to Severe Cyclonic Storm Asani in BoB. Satellite obs, track prediction, Wind fields, All India Severe weather warnings. Orange alert on East coast today. Tomorrow its RED. pic.twitter.com/oe9TmSmbRq
हे सुद्धा वाचा— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 10, 2022
10 मे पासून मान्सून केरळात
देशात मान्सूनची सुरवात ही केरळातूनच होते. यंदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 अर्थात बुधवारीच मान्सून केरळात दाखल होत आहे. नियमित वेळीच त्याचे आगमन होणार असून महाराष्ट्रात आगमन होण्यासाठी बराच आवधी आहे. त्यामुळेच सध्याच्या चक्रीवादळाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. तोपर्यंत अणखीन काही परस्थिती बदलू शकते पण सध्या तरी मान्सूनच्या आगमनाला किंवा पर्जन्यमानावर परिणाम असे काहीच नसल्याचे अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.
मान्सूनची सुरवात सामान्य
ज्याप्रमाणे केरळात मान्सूनचे वेळेत आगमन होणार आहे त्याच प्रमाणाच मान्सून आगेकूच करणार आहे. दरवर्षी सुरवातीच्या किंवा मध्यावर पावसाची उघडीप ही ठरलेलीच आहे. यंदा सुरवात सामान्या राहणार असून मध्यानंतर मात्र अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस बरसणार आहे. असे असले तरी मान्सूनपुर्वच्या सरी बरसणार आहेतच.पण मान्सून सक्रीय किंवा 100 मीमी पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवावी असा सल्लाच कृषी विभागाने दिलेला आहे. त्यामुळे पहिलाच पाऊस झाला की लागलीच पेर केल्यावर दुबारचे संकट ओढावते.
ऊन-पावसाचा खेळ सुरु राहणार
हवामानात बदल होत असला तरी राज्यात सर्वत्रच एक सारखी स्थिती नाही. ‘असानी’ चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात उष्ण लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे राज्यात ऊन आणि तेवढ्याच प्रमाणात पाऊसही अशी स्थिती ओढावलेली आहे. राज्यातील विदर्भ, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.