AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadhi Ekadashi 2021 | कुठे समुद्रकिनाऱ्यावर, तर कुठे विटेवर विठ्ठलाची प्रतिमा, कलाकारांच्या भक्तीचं आगळंवेगळं रुप

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालखी सोहळ्यासह वारीवर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र तरीही काही हौशी कलाकारांनी घरात राहून मनोभावे विठूरायाची विविध रुपे साकारली आहे. कुठे समुद्रकिनारी तर कुठे विटेवर विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे.

| Updated on: Jul 20, 2021 | 12:38 PM
मोठ्या थाटामाटात जल्लोषात साजरी केल्या जाणाऱ्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, या अभंगाप्रमाणे पंढरपुरातील विठूरायाचे रुप आज खुलून निघालं आहे.

1 / 10
आषाढी एकादशी हा सण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी पर्वणी असते. या सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात.

2 / 10
आषाढीला ‘देवशयनी एकादशी’ असं ही म्हणतात. आषाढ महिन्यात उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होतं. या काळात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देतात. असूर शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी देवांची पूजा केली जाते.

3 / 10
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालखी सोहळ्यासह वारीवर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र तरीही काही हौशी कलाकारांनी घरात राहून मनोभावे विठूरायाची विविध रुपे साकारली आहे. कुठे समुद्रकिनारी तर कुठे विटेवर विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालखी सोहळ्यासह वारीवर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र तरीही काही हौशी कलाकारांनी घरात राहून मनोभावे विठूरायाची विविध रुपे साकारली आहे. कुठे समुद्रकिनारी तर कुठे विटेवर विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे.

4 / 10
आषाढी एकादशी निमित्ताने वेंगुर्ल्यातील निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर फक्त रांगोळी आणि वाळूच्या सहाय्याने हातांच्या बोटांनी 30 फूट आकाराची विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे.

5 / 10
अल्पेश घारे असे या युवा चित्रकाराचे नाव आहे. तो कुडाळमधील पाट या ठिकाणी राहतो. अल्पेशने रांगोळीच्या सहाय्याने साकारलेलं विठ्ठलाचं हे मनमोहक रूप मनमोहून टाकत आहे. पंढरपुरची वारी आणि वारकऱ्यांप्रती असलेली भावना अल्पेशने कलेच्या माध्यमातून समर्पित केली आहे.

6 / 10
तर दुसरीकडे देवगडमधील गवाणे गावातील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने मातीच्या विटेवर विठ्ठलाची वेगवेगळ्या रूपातील 16 मनमोहक चित्र रेखाटली आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अक्षयने आगळ्या वेगळ्या भक्तीचा संदेश दिला आहे.

7 / 10
अक्षयने 16 विटांचा वापर करून प्रत्येक विटेवर विठ्ठलाचे वेगवेगळे मनमोहक चित्र रेखाटले आहे. त्यामुळे ते सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहे. वेगवेगळ्या वेषभूषेतील विठ्ठलाचं हे मनमोहक रूप पाहून भक्तही भारावत आहेत.

8 / 10
तसेच सोलापुरातील एका दिव्यांग तरुणीने विठुरायाबद्दलची भक्ती एका आगळ्यावेगळ्या रुपात प्रकट केली आहे.

9 / 10
दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी शिंदे या तरुणीने आपल्या पायाने सावळ्या विठुरायाचे चित्र साकारले आहे. तसेच कोरोनाचे निर्बंध पाळत घरातूनच वारीचा आनंद घ्या, असे आवाहनही तिने भक्तांना केलं आहे.

10 / 10
Follow us
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.