ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे न्यायालयात विधिमंडळाचे दिवाळे निघाले, शेलार पुन्हा कडाडले

बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणात ठाकरे सरकारने अहंकारी भूमिका घेतली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कधी नाही तेवढी महाराष्ट्र विधिमंडळाची नाचक्की झाली, दिवाळे निघाले, अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे न्यायालयात विधिमंडळाचे दिवाळे निघाले, शेलार पुन्हा कडाडले
आशिष शेलार यांची महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 3:58 PM

मुंबई : गेल्या काही दिवसात भाजपच्या 12 आमदरांचे निलंबन (Bjp Mla) चांगलेच गाजले आहे. विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी महाविकास आघाडीने आक्रमक (Mahavikas Aghadi) होत आमदारांचे निलंबन केले. त्यानंतर त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली. सुप्रिम कोर्टाने ही निलंबन रद्द ठरवलं. आता पुन्हा भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावरूनच ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणात ठाकरे सरकारने अहंकारी भूमिका घेतली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कधी नाही तेवढी महाराष्ट्र विधिमंडळाची नाचक्की झाली, दिवाळे निघाले, अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. भाजपाच्या 12 आमदार निलंबनाचा विषय आज विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाचे याचिकाकर्ते आमदार अँड आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यातील काही भाग वाचून त्यांनी बाजू मांडली.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळाने आमदारांना निलंबित करण्याचा ठराव हा अवैध, असंविधानीक, अतार्किक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा ठराव खारीज झाल्याने 12 आमदारांना सभागृहात येण्याचे मार्ग खुले झाले. विधिमंडळाचे अधिकार सर्वोतोपरी अबाधित रहावे अशीच भाजपाची भूमिका असून या ठरावावर निर्णय देताना ही न्यायालयाने सभागृहाच्या अधिकारावर गदा आणलेली नाही. निलंबनाचा अधिकार अबाधित ठेवला आहे. असेही ते म्हणाले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना न्यायालयाने विधिमंडळाचे अधिकार अबाधित रहावे म्हणून याबाबत बारा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका करावी, विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी करुन याबाबत निर्णय घ्यावा असेही अंतरिम आदेश दिले होते. त्यावेळी 12 आमदारांनी याचिका करुनही विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना सुनावणी केली नाही. असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकार चुकीची माहिती देत आहे

तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयात आपली बाजु मांडावी अशी नोटीस न्यायालयाने दिली होती त्यावेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर येणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमुर्तीं च्या खंडपीठाने निवाडा दिल्यानंतर याबाबत अपिल दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संधी विधिमंडळाने गमावल्या आहेत. याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य करणार नव्हतो पण सरकारकडून वारंवार विपर्यास करुन माहिती दिली जात आहे. हा ठराव अवैध, असंविधानीक, अतार्किक नाही असे सरकारकडून सांगितले जाते आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मारलेल ताशेरे पुन्हा वाचून दाखवत आमदार अँड आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारच्या याच अहंकारामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली, अशी टीका त्यांनी केली.

Assembly Election Result 2022 : उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेना सपाटून पडली, संजय राऊत म्हणतात, अजून लढाई संपली नाही !

Goa Election | गोव्याचं मोठं यश कुणामुळे? फडणवीसांनी घेतली दोन नावं, गोव्यातल्या सरकारचा प्लॅनही सांगितला

Punjav Assembly Election Result LIVE 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.