राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ, शेलारांचा जहरी वार

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला कडाडून विरोध करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी अत्यंत जहरी टीका कली आहे. (ashish shelar slams raju shetti over farm laws)

राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ, शेलारांचा जहरी वार
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 1:43 PM

सांगली: केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला कडाडून विरोध करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी अत्यंत जहरी टीका कली आहे. राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात शेलार विरुद्ध शेट्टी अशी शाब्दिक चकमक झडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (ashish shelar slams raju shetti over farm laws)

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आजपासून किसान आत्मनिर्भर यात्रेस सुरुवात केली आहे. आशिष शेलार यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत शेलार यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. त्यात एक शिक्षक मोहापायी वाहवत जातो. शेवटी त्याला हाती तुणतुणे हाती धरण्याची वेळ येते. आताही तेच चित्रं दिसत आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या एका नेत्याला एका विधानपरिषदेसाटी हाती तुणतुणे धरण्याची वेळ आली आहे. फडावर जसं तुणतुणं हाती घ्यावी लागतं तसंच एक दलाला विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीची बाजू घेऊन तुणतुणे वाजवत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

अंबानी, अदानीसाठी काठी घेऊन बसलोय

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही. अंबांनी आणि अदानीमुळे तर शेतकऱ्यांच्या हक्कांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. अंबानी, अदानींनी शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लावला तर त्यांच्यासाठी मी मुंबईत काठी घेऊन बसलो आहेच, असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना गुलामगिरीतून बाहेर काढण्याचं काम सुरू

आजपासून खऱ्या अर्थाने किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना भ्रमित केले जात आहे. या यात्रेतून शेतकऱ्यांचा हा संभ्रम दूर होईल. त्यांना कायद्याची योग्य माहिती दिली जाईल, असं सांगातनाच जे लोक फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेत आहेत. तेच लोक या महापुरुषांच्या विरोधात वागत आहेत. शेतकऱ्यांना गुलामगिरीतून बाहेर काढण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असताना हेच लोक शेतकऱ्यांना गुलामगिरीकडे घेऊन जात आहेत, असंही शेलार म्हणाले. काही वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीनेच हा कायदा आणला होता. त्याबाबत दोन्ही काँग्रेसने उत्तरं द्यावीत, असं आवाहनही त्यांनी केलं.

वडेट्टीवार यांचे आरोप बिनबुडाचे

लक्ष्मी दर्शनावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेचाही शेलार यांनी समाचार घेतला. वडेट्टीवार यांच्या खात्याला निधी मिळत नाही. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. वडेट्टीवार यांची लढाई ओबीसींना आर्थिक निधी गोळा करून देण्यात वेळ जात आहे. त्यांच्या खात्याला निधी मिळत नाही आणि त्यांना कुणी प्रतिसादही देत नाही. त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील आघाडी सरकारमध्ये प्रचंड लक्ष्मी दर्शन सुरू आहे. ‘काँग्रेसच्या हातावर तुरू आणि शिवसेना-राष्ट्रवादीची वाटमारी’, अशी अवस्था या सरकारची झाली आहे. त्यामुळेच त्यांची बेताल बडबड पाहायला मिळत आहे, असंही ते म्हणाले.

उशिरा सुचलेलं शहाणपण

यावेळी त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवू न शकणाऱ्यांना उशिरा का होईना शहाणपण आले आहे. आता ईएसडब्ल्यूच्या माध्यमातून मराठा तरुणांना आरक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे या तरुणांना मदत होणार असून त्याचं आम्ही स्वागतच करतो, असं सांगतानाच मराठा तरुणांचं आतापर्यंत जे नुकसान झालं आहे, त्याचं या सरकारने उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यानी केली. (ashish shelar slams raju shetti over farm laws)

संबंधित बातम्या:

इतिहास लिहिला जाईल, तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे, सदाभाऊंचा पवारांवर हल्लाबोल

बोंडेंनी विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत; राजू शेट्टींचा सल्ला

यात्रा सदाभाऊ खोतांची, सारथी भाजप नेते; वाचा ‘किसान आत्मनिर्भर यात्रे’चा संपूर्ण कार्यक्रम

लोकल सुरु व्हावी ही मुख्यमंत्र्यांची इच्छा, येत्या दहा दिवसात निर्णय, वडेट्टीवारांची घोषणा

(ashish shelar slams raju shetti over farm laws)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.