Nashik| मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आडगाव परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik| मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी
नाशिकमध्ये हल्ल्यात जखमी झालेला दीपक वाघमारे.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 12:33 PM

नाशिकः वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आडगाव परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक वाघमारे या तरुणावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खून, हल्ला आणि दरोड्याचे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, गुन्हेगारीला आळा घालावा, अशीच मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

संशयित हल्लेखोराला बेड्या

नाशिकमधील आडगाव परिसरात दीपक वाघमारे या तरुणाने वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली. त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, तिथे असलेल्या इतरांना हा प्रकार रुचला नाही. त्यातल्या दोघांनी दीपकवर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे दीपक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अतिशय किरकोळ कारणावरून हा हल्ला केल्याने नाशिकमधील गुन्हेगारी कशा पद्धतीने वाढत आहे, हेच पुन्हा एकदा समोर आले आहे.

खुनानंतर हल्ले, दरोडे

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एकाच आठवड्यात सलग तीन खून झाले. त्यानंतर सलग दोन दरोडे पडले. इतकेच नाही तर दोन दिवसांपूर्वीही नाशिकमधील सुप्रसिद्ध शिल्पकार मंदार गर्गे यांच्या स्टुडिओवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून महापुरुषांच्या पुतळ्यातील तब्बल 1400 किलोच्या ब्राँझ धातूची लूट केली आहे. त्यात सुरक्षारक्षक आणि त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. या दरोडोखांना मुंबईत बेड्या ठोकल्या. त्यानंतर ही घटना घडली आहे.

हैदोस थांबवावा

नाशिकची प्रचंड वेगाने क्राईमनगरीकडे सुरू असलेली वाटचाल कधी थांबणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत. एकीकडे हे सर्व सुरू असताना शहराचे पोलीस आयुक्त फक्त हेल्मेटसक्ती हा एकच मुद्दा रेटून धरत आहेत. त्यांनी या घटनांकडेही लक्ष द्यावे. उद्योगनगरीतील गुन्हेगारांचा हैदोस थांबवावा, अशी मागणी होत आहे. एकदा नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, तर उद्योग पाठ फिरवतील, अशी भीतीही व्यक्त होत आहे. हे पाहून पोलिसांनी काही तरी पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर बातम्याः

Nashik | 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट; 311 उमेदवार रिंगणात

Omicron जनजागृती; ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षांची चक्क नाशिक ते शिर्डी 90 किमीची धाव, 6 वर्षांपासून उपक्रम

Nashik| बोरीपाडा आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अभ्यास बुडू नये म्हणून वसतिगृहात ठेवले अन्…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.