Pune Girl Attack : लग्नास प्रतिसाद देत नसल्यानं 17 वर्षीय मुलीचा गळा चिरला, पुण्यात दौंड तालुक्यातील घटना

राहुल निरजे हा पीडित युवतीवर प्रेम करत होता. या युवतीशी लग्न व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र संबंधित युवतीकडून प्रतिसाद मिळत नव्हता.

Pune Girl Attack : लग्नास प्रतिसाद देत नसल्यानं 17 वर्षीय मुलीचा गळा चिरला, पुण्यात दौंड तालुक्यातील घटना
लग्नास प्रतिसाद देत नसल्यानं 17 वर्षीय मुलीचा गळा चिरलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 12:10 AM

पुणे : लग्नाला प्रतिसाद देत नसल्यानं एका 17 वर्षीय मुलीचा गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) करण्यात आल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ नजीक पुणे-सोलापूर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात ही घटना घडली. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात (Detained) घेण्यात आले आहे. राहुल श्रीशैल निरजे (27) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी (Injured) झाली असून तिला उपचारासाठी दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

आरोपीचे पीडित तरुणीशी प्रेमसंबंध होते

राहुल निरजे हा पीडित युवतीवर प्रेम करत होता. या युवतीशी लग्न व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र संबंधित युवतीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. याच रागातून त्याने या युवतीला शेतात गाठून तिचा गळा चिरत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत ही युवती गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे. तिला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर राहुल निरजे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

पिंपरीत सिगरेटच्या वादातून अल्पवयीन मुलाची हत्या

मित्राला सिगरेट दिली नाही म्हणून दोन मित्रांनी कोयत्याने वार करुन 15 वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. सुमित बनसोडे (15) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पाच ते सात मित्र जुना जकात नाका येथे जंगलात दारु पिऊन नाचत होते. यावेळी एका मित्राने सुमितकडे सिगारेट मागितली. मात्र सुमितने सिगारेट देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या दोन मित्रांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सर्व मुलांना ताब्यात घेतले आहे. (Attempt to kill a 17-year-old girl in Pune for not responding to marriage)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.