या शहराला औरंगजेब या मुघल बादशहाच्या नावावरुन औरंगाबाद असं नाव होते. या शहराचे पूर्वीचे नाव फतेहनगर असे होते, असं देखील म्हणतात. आता या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. औरंगाबाद हायकोर्ट आणि मराठवाड्यातील प्रमुख शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. मराठवाडा प्रांतासाठी छत्रपती संभाजीनगर हे महत्त्वाचे शहर आहे, औद्योगिक बाबतीत देखील संभाजीनगर हे आघाडीवर आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ. कला, वाणिज्य आणि विज्ञान याबाबतीत छत्रपती संभाजीनगर आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे आहे.
इतिहासात छत्रपती संभाजीनगर शहराला आणि जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. अजिंठा लेणी या जिल्ह्यात येत असल्याने एक महत्त्वाचे पर्यंटन शहर म्हणूनही या शहराची ओळख आहे.यामुळे परदेशी पर्यटकांची नेहमीच या शहरात रेलचेल दिसून येते.हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. छत्रपती संभाजीनगर हे या लढ्याचे एक केंद्र बनले. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर हे शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवसापासून छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचा भाग बनले.
पुढे वाचा