AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुजय विखे-पाटलांना धक्का, रेमडेसिव्हीर प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करा; कोर्टाचे पोलिसांना आदेश

कोर्टाने पोलिसांना रेमडेसिव्हीर खरेदी प्रकरणी स्वतंत्रपणे तपास करण्याची सूचना केली आहे. (Remdesivir import Sujay Vikhe)

सुजय विखे-पाटलांना धक्का, रेमडेसिव्हीर प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करा; कोर्टाचे पोलिसांना आदेश
SUJAY VIKHE
| Updated on: May 05, 2021 | 6:38 PM
Share

औरंगाबाद : राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना हवाईमार्गे थेट दिल्लीहून इंजेक्शन आणल्याप्रकरणी भाजप खासदार सुजय विखे (BJP MP Sujay Vikhe) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याच प्रकरणी विखेंविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढली आहे. कोर्टाने पोलिसांना या प्रकरणी स्वतंत्रपणे तपास करण्याची सूचना केली आहे. कोर्टाच्या या निर्देशामुळे आता पोलिसांचा सुजय विखे यांच्या विरोधातील तपास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Aurangabad bench of high court allowed to take action against BJP MP Sujay Vikhe in Remdesivir import case)

अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याच्या वाटपाबद्दलची माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली होती. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला होता. या प्रकरणी औरंगाबाद येथे अ‌ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत डॉ. सुजय विखे यांचावर रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा कोणताही कायदेशीर परवाना तसेच अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती करण्यात आली होती. तीच याचिका आज कोर्टाने निकाली काढली.

कोर्ट काय म्हणालं ?

या प्रकरणाबद्दल सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले. “या प्रकरणात याचिकार्ते, पोलीस, जिल्हाधिकारी व डॉ. सुजय विखे यांनी सादर केलेल्या कागदपत्रातून वस्तुस्थितीचे एकमत होत नाही.  वस्तुस्तिथी तपासण्याचे तसेच चौकशी करण्याचे काम न्यायालयाचे नाही. हे काम तपास अधिकाऱ्याने करायचे आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या साठ्याची गोपनीयता पाळण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे तयार केली आहे का ? डॉ. विखे यांनी चंदीगड येथून शिर्डी येथे खासगी विमानाने आणलेले इंजेक्शन हे कोणत्या कंपनीचे आहे?  16700 इंजेक्शनच्या साठ्याव्यतिरिक्त अजूनही साठा असल्याचा याचिकार्त्याचा दावा खरा आहे का ? त्यासाठी तपास अधिकाऱ्याला फौजदारी प्रक्रियेच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे,” असे न्यायालय म्हणाले.

तपास करुन योग्य ती कारवाई करा

तसेच, याचिकाकर्त्यांना या प्रकरणातील आणखी काही कागदपत्रे पोलीस ठाण्याला देण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. तपास अधिकाऱ्यांनी योग्य तो तपास केल्यानंतर फौजदारी प्रक्रियेच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, कोणताही अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा अन्य कोणी या प्रकरणात बनावट कागदपत्रे बनवत असेल त्यांच्या विरुद्धदेखील तक्रार देण्याची मुभा याचिकाकर्त्यांना न्यायालयाने दिली आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले. तसेच तपास अधिकाऱ्याने योग्य प्रकारे कार्यवाही न केल्यास परत न्यायालयात येण्याची मुभासुद्धा कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिली आहे.

इतर बातम्या :

Maratha Reservation Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार

LIVE | वाशी टोल नाका येथे मराठा क्रांती मोर्चाचा रास्ता रोको अंदोलन

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी

(Aurangabad bench of high court allowed to take action against BJP MP Sujay Vikhe in Remdesivir import case)

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.