Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad : औरंगाबादकरांसाठी मोठी गूडन्यूज, पाणीपट्टी कपातीचा निर्णय पुढच्या आठवड्यापासून लागू, अर्धे पैसे वाचणार

औरंगाबाद शहराच्या पाणी पट्टीच्या रकमेत अर्ध्याने कपात केली गेली आहे. आता 4 हजार रुपयांऐवजी 2 हजार रुपये एवढी ही रक्कम करण्याचा मंत्री सुभाष देसाई यांनी निर्णय घेतला आहे.

Aurangabad : औरंगाबादकरांसाठी मोठी गूडन्यूज, पाणीपट्टी कपातीचा निर्णय पुढच्या आठवड्यापासून लागू, अर्धे पैसे वाचणार
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 8:47 PM

औरंगाबाद : औरंगाबादकरांसाठी (Aurangabad Water Supply) एक मोठी गूडन्यूज आहे. मंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी कपातीचा (Water Bill) घेतलेला ठराव पुढच्या आठवड्यापासून आमलात आणला जाणार आहे. औरंगाबाद शहराच्या पाणी पट्टीच्या रकमेत अर्ध्याने कपात केली गेली आहे. आता 4 हजार रुपयांऐवजी 2 हजार रुपये एवढी ही रक्कम करण्याचा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहराला पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. यामुळेच आता शासनाने कर कपातीचा निर्णय घेतला आहे. पाण्याच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे अत्यंत विराट मोर्चा काढण्यात आला होता, त्यावरूनही बरेच राजकारण रंगले होते. त्यामुळे आता तरी हे राजकारण थांबणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण

गेल्या काही दिवसांत शहराला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पुरेस पाणी भरण्याच्या आगोदरच पाणी बंद होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं होतं.

गेल्या काही महिन्यात पाणीप्रश्न गंभीर

गेल्या काही महिन्यात शहरातील पाणी प्रश्नानं अधिकच गंभीर रुप धारण केलं असल्याने भाजपतर्फे सत्ताधारी शिवसनेला आणि राज्य सरकारमधील महाविकास आघाडीला धरण्यासाठी आज विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील लोक भाजपने पैसे देऊन आणले आहेत, असाही आरोप शिवसेना नेते आंबादार दानवे यांच्याकडून झाला होता. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं हों. पैठण गेट परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि या मोर्चात पाणी समस्येनं त्रस्त असलेल्या महिला व पुरुषांनी सहभागी होण्याचं आवाहन भाजपतर्फे करण्यात आलं होतं, भाजपचा हा मोर्चा राज्यभर गाजला होता.

हे सुद्धा वाचा

मोर्चात पंकजा मुंडे नव्हत्या

भाजपच्या मोर्चात भाजप नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या नव्हत्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. ज्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाची पंकजा मुंडे यांनी संभावना केल्याचेही नंतर दिसून आले. तसेच मी राष्ट्रीय लेव्हलवर काम करते. कालच्या मोर्चात कदाचित माझी उपस्थिती अपेक्षित नसावी, असे म्हणतानाही त्या दिसून आल्या. तर त्यामुळे मी आले नाही. पण कालचा मोर्चा हा लोकल लीडर्सचा मोर्चा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.