धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर, औरंगाबादेत तरुणाचा बुडून मृत्यू

आकाश अप्पासाहेब शेलार हा तरुण चापाणेर येथील धरणावर मित्रासोबत पोहायला गेला होता. (Aurangabad Boy Drowning in Dam)

धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर, औरंगाबादेत तरुणाचा बुडून मृत्यू
औरंगाबादेत तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 1:11 PM

औरंगाबाद : मित्रासोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाला पाण्यात बुडून जीव गमवावा लागला. औरंगाबाद जिल्ह्यातील चापाणेर गावात ही घटवा घडली. (Aurangabad Boy Dies after Drowning in Dam)

आकाश अप्पासाहेब शेलार हा तरुण चापाणेर येथील धरणावर मित्रासोबत पोहायला गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

धरणाच्या पाण्यात उडी घेण्याचा मोह

आकाश पहाटे साडेसहा वाजताच मित्रासोबत धरणावर गेला होता. धरणातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून त्याने पाण्यात उडी मारली. मात्र धरणात मोठ्या प्रमाणात खोलीकरण झाल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.

उपचारासाठी नेताना प्राण सोडले

आकाश बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी कन्नड येथे नेले जात असताना रस्त्यातच त्याने प्राण सोडले.

बीडमध्ये तिघा जीवलग मित्रांचा मृत्यू

बीड शहरापासून जवळ असलेल्या पांगरबावडी शिवारात पोहायला गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. तिघे मित्र पोहण्यासाठी खदानीमध्ये गेले होते. मात्र, तिघांचाही बुडून मृत्यू झाला.ओम जाधव, मयूर गायकवाड, श्याम देशमुख अशी मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेही बीड शहरातील गांधीनगर भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे. (Aurangabad Boy Drowning in Dam)

बीडमध्ये सेल्फी घेताना धरणात बुडून दोघांचा मृत्यू

सेल्फी घेण्याच्या नादात आतापर्यंत अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना घडत असतात. मागील महिन्यात बीड जिल्ह्यात सेल्फी काढण्याच्या नादात धरणात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. मालेगाव तालुक्यातील विराने शिवारात ही घटना घडली होती. हर्षल जाधव (22) , रितेश जाधव (18) असे बुडून मृत्यू झालेल्या भावांची नाव आहेत. विराने तलावाच्या काठावर ते सेल्फी काढत होते.

संबंधित बातम्या

वाढदिवसासाठी मित्र-मैत्रिणी धरणावर गेले, केक कापला, सेलिब्रेशन केलं, पण सेल्फी काढताना घात, सहा जणांचा मृत्यू

कोल्हापुरात रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुलांना सांभाळा, बीडमध्ये तीन मित्रांनी गमावला जीव, वाचा काय घडलं?

(Aurangabad Boy Dies after Drowning in Dam)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.