Aurangabad | औरंगाबाद हादरलं, प्रियकराने प्रेयसीला इतक्या निर्घृणपणे मारलं की पोलिसही चक्रावले….
पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार , सौरभ याने तीन दिवसांपूर्वीच अंकिताचा खून केला. त्यानंतर अंकिताची रुम बंद होती. आज सकाळी दरवाजा उघडून तो मृतदेह घेऊन जाण्याच्या तयारीत होता.
औरंगाबादः औरंगाबाद शहरात प्रियकराने प्रेयसीचा अतिशय निर्घृणपणे खून (Aurangabad murder) केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील हाडको परिसरातील डीमार्ट मॉलजवळ एका खोलीत महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार, सदर महिलेचा तीन दिवसांपूर्वीच खून झाला असावा. मात्र रुमला बाहेरून कुलूप असल्याने कुणाला काहीच कळले नाही. आज सकाळी आरोपी प्रियकर रुम उघडून तिच्या मृतदेहाची (Deadbody) विल्हेवाट लावू लागला, त्यावेळी शेजाऱ्यांना घरातून वास आला. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता आत रक्ताचा सडा दिसला. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना (Police) यासंबंधीची माहिती दिली. विशेष म्हणजे एकिकडे नागरिकांच्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी दाखल झाले तर दुसरीकडे आरोपी स्वतः हा मृतदेह घेऊन ग्रामीण पोलिसांसमोर हजर झाला. प्रेयसीचा अशा प्रकारे निर्घृण खून केल्याच्या या घटनेमुळे औरंगाबादेत खळबळ माजली आहे.
काय घडलं नेमकं?
याविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी प्रियकराचे नाव सौरभ लाखे असे आहे. शिऊर बंगला या गावातून स्थानिक वर्तमान पत्रासाठी करत होता . मयत मुलगी अंकिता ही जालन्यातून एमपीएससी-युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबाद शहरात आली होती. याच काळात दोघांचे परस्परांवर प्रेम जडले. अंकिता ज्या रुमवर रहात होती, तिथे सौरभचे येणे-जाणे सुरु होते. तीन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर सौरभने तिचा खून केल्याचा संशय आहे.
मी खून केला…. पोलिसांच्या ग्रुपवर पोस्ट टाकली
पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार , सौरभ याने तीन दिवसांपूर्वीच अंकिताचा खून केला. त्यानंतर अंकिताची रुम बंद होती. आज सकाळी दरवाजा उघडून तो मृतदेह घेऊन जाण्याच्या तयारीत होता. मात्र शेजाऱ्यांना उग्र दर्प आल्याने त्यांनी खोलीत पाहिले. तेथे रक्ताचा सडा पडलेला दिसला. नागरिकांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत सौरभ ग्रामीण पोलिसांच्या देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात पोहोचला. आपण मृतदेह गाडीत घेऊन आल्याची माहिती त्याने दिली आणि याच वेळी पोलीस आणि पत्रकारांच्या ग्रुपवर मी खून केला असल्याची माहिती दिली. ज्या ठिकाणी खून झाला ते ठिकाणी औरंगाबाद शहर पोलिसांच्या हद्दीत येते तर तर आरोपी ज्या पोलीस ठाण्यात हजर झाला, ते ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येते. सध्या तरी शहर पोलिसांनी आरोपी आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे. तरुणीचा मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात येईल.