Aurangabad Corona Update | औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर, सहा दिवसात 178 रुग्णांची वाढ
औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी नवे 28 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 349 वर (Aurangabad Corona Virus Update) पोहोचला आहे.
औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत (Aurangabad Corona Virus Update) आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी नवे 28 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 349 वर पोहोचला आहे. औरंगाबादेतील निवासी वैद्यकीय अधिकारी महेश लड्डा यांनी याबाबतची माहिती दिली.
औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण वाढत आहे. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा काल (5 मे) 24 रुग्ण आढळले होते. तर आज एका रात्रीत 28 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 349 वर पोहोचला आहे.
औरंगाबादेतील सहा दिवसातील रुग्णांची वाढ
तारीख – रुग्ण
- 1 मे – 39
- 2 मे – 23
- 3 मे – 17
- 4 मे – 47
- 5 मे – 24
- 6 मे – 28
औरंगाबादेत 1 मे रोजी 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2 मे रोजी औरंगाबादेत आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर 3 मे रोजी 17 रुग्ण, 4 मे रोजी 47 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर 5 आणि 6 मे रोजी अनुक्रमे 24 आणि 28 कोरोनाची रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या 6 दिवसात एकट्या औरंगाबादेत 178 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा अलर्टवर आला (Aurangabad Corona Virus Update) आहे.
संबंधित बातम्या :
Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 426 वर, एकट्या मालेगावात 349 रुग्ण
पिंपरी चिंचवडला ‘कोरोना’चा विळखा, तळवडे-चिखलीत 34 रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?