Dr. BAMU University Exams | औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार, विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या, नवी तारीख काय ?

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. (aurangabad dr bamu exams corona virus)

Dr. BAMU University Exams | औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार, विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या, नवी तारीख काय ?
BAMU EXAMS
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 4:40 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आलेले असले तरी; अजूनही राज्यात रोज शेकडो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. औरंगाबाद शहराची परिस्थिती तर जास्त चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. BAMU) परीक्षासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ प्रशासनाने मार्च/ एप्रिल 2021 मधील परीक्षा पुढे ढकलली आहे. (Aurangabad Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Dr. BAMU postpone exams due to Corona virus)

वेळापत्रकात बदल

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येत राज्यात कोरोनाग्रस्त आढळत आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राज्यात ठिकठिकाणी विविध परीक्षा होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना वाढल्यामुळे परीक्षा घेणे जिकरीचे ठरु शकते, असे अनेक आरोग्यतज्ज्ञांकडू सांगण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये तर ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. येथे रोज 1200 ते 1500 यामध्ये रुग्ण आढळत आहेत. याच कारणामुळे औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षा मार्च आणि एप्रिल महिन्या होणाऱ्या पदवी परीक्षा आता या वर्षी 3 मे पासून घेण्यात येतील.

BAMU

BAMU

विद्यापीठांचा परीक्षा कशा होणार  ?

राज्यातील पदवी आणि पदव्यूत्तर परीक्षेसंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गमध्ये भाष्य केले.  “राज्यात कोरोना वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत आहेत. त्यांच्या निर्णयाचं स्वागतच आहे. राज्यात अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क पोहोचत नाही तिथं ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा कशा घ्यायच्या हा त्या-त्या विद्यापीठाचा निर्णय आहे. सोलापूरसारख्या विद्यापीठात परीक्षा घेऊन झाल्या आहेत. तेथे ते निकालापर्यंत पोहोचले आहेत. सोलपूर विद्यापीठाने पूर्ण तयार केली आहे,” असं उदय सामंत म्हणाले.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांचे त्वरित लसीकरण करावे, खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

Weather Alert: महाराष्ट्रात येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज

विद्यापीठांच्या परीक्षा कशा होणार ?, उदय सामंत काय म्हणाले ?

(Aurangabad Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Dr. BAMU postpone exams due to Corona virus)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.