औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सर्व विभाग एकाच छताखाली येणार, सर्वसाधारण सभेत निर्णय
जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीची निविदेच्या दरसुचीला मान्यता देण्याचा ठराव आज पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर आता तातडीने नव्या इमारतीच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी दिले आहेत.
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आता एकाच छताखाली येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीची निविदेच्या दरसुचीला मान्यता देण्याचा ठराव आज पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर आता तातडीने नव्या इमारतीच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता उद्यापासून नियोजित जागेतील जुन्या इमारतींचं पाडकाम सुरु करण्यात येणार आहे. तशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. (General meeting approves construction of new building of Aurangabad ZP)
औरंगपुरा परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जीर्ण आणि धोकादायक बनली होती. त्यामुळे नव्या इमारतीच्या बांधकामाला मान्यता देण्यात आली आहे. तर नव्या इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेथाली आज विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत नव्या इमारतीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. बांधकाम सभापती किशोर बलांडे म्हणाले की, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे उच्चाधिकारी समितीच्या बैठकीला मान्यता मिळाली आहे. तसंच महिनाभरात दुकान गाळे आणि शॉपिंग सेंटरसाठी निविदा मागवण्यात येतील. अजिंठा वेरुळच्या धरतीवर इमारतीचं स्ट्रक्चर असल्याचं बलांडे यांनी सांगितलं.
जुन्हा इमारतीचं रुपांतर हेरिटेजमध्ये करण्याची मागणी
जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांनी किती निविदा आल्या, त्यातील किती मंजुर झाल्या याची माहिती सदस्यांना देण्यात यावी. तसंच नव्या इमारतीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे जेवढे सदस्य आहेत, त्यांची नावं कोनशिलेवर असावी असंही त्यांनी म्हटलंय. तर किशोर पवार यांनी जुन्हा इमारतीचं रुपांतर हेरिटेजमध्ये करुन यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ग्रंथालय किंवा आर्ट दालन सुरु करण्याची मागणी केली आहे.
औरंगाबाद विद्यापीठात आत्मदहनाचा प्रयत्न
विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर पदाधिकाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर रोजंदारी कामगारांना नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. रोजंदारी कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळावं, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत थकित वेतन मिळावं, यासाठी पदाधिकाऱ्याने कुलसचिवांच्या कार्यालयातच धिंगाणा घातला.
इतर बातम्या :
‘महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं रोखलं तरी दहिहंडी होणार’, भाजप आमदाराचं थेट आव्हान
General meeting approves construction of new building of Aurangabad ZP