औरंगाबादचे अधिकारी दाम्पत्य क्वारंटाईन, आस्तिक कुमार-मोक्षदा पाटलांच्या आचाऱ्याला कोरोना

जिल्ह्यातील दोन मोठे अधिकारीच क्वारंटाईन झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील 'कोरोना' विरोधी मोहिमेला धक्का बसण्याची भीती वर्तवली जात आहे. (Aurangabad Municipal Commissioner Astik Kumar Pandey Superintendent of Police Mokshada Patil Home Quarantine)

औरंगाबादचे अधिकारी दाम्पत्य क्वारंटाईन, आस्तिक कुमार-मोक्षदा पाटलांच्या आचाऱ्याला कोरोना
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 2:43 PM

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील दोन मोठे अधिकारी क्वारंटाईन झाले आहेत. आचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील हे दाम्पत्य क्वारंटाईन झाले आहे. (Aurangabad Municipal Commissioner Astik Kumar Pandey Superintendent of Police Mokshada Patil Home Quarantine)

आस्तिक कुमार पांडे आणि मोक्षदा पाटील हे पती-पत्नी औरंगाबादमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या घरी काम करणारा कुक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे या दाम्पत्यावर होम क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील दोन मोठे अधिकारीच क्वारंटाईन झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील ‘कोरोना’ विरोधी मोहिमेला धक्का बसण्याची भीती वर्तवली जात आहे.

औरंगाबादेत आज सर्वाधिक रुग्णसंख्येची वाढ झाली. औरंगाबादेत आज एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक 230 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 4 हजार 266 वर पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजप आमदाराला कोरोनाची बाधा

आज सकाळी आढळलेल्या 230 रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत 124 आणि ग्रामीण भागात आढळलेले 106 रुग्ण आहेत. यामध्ये 77 महिला आणि 153 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या 24 तासात औरंगाबादमध्ये 12 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 218 वर गेला आहे. जिल्ह्यात 1831 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 2217 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(Aurangabad Municipal Commissioner Astik Kumar Pandey Superintendent of Police Mokshada Patil Home Quarantine)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.