Big News: देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न! लाल दिवा दाखवून रेल्वेवर दगडफेक;महिलेचे दागिने लंपास

मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. सध्य या बाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Big News: देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न! लाल दिवा दाखवून रेल्वेवर दगडफेक;महिलेचे दागिने लंपास
औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांकडून सशस्त्र दरोडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 7:52 AM

औरंगाबादः औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकावर (Potul Railway Station) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रेल्वे सिग्नलला कापड बांधून रेल्वेवर आठ ते दहा जणांनी दरोडा (Robbery) टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे सिग्नलला कापड बांधून मध्यरात्री दौलताबाद-पोटूळ दरम्यान लाल दिवा दाखवून रेल्वे थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दरोड्यात एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन, इतर काही वस्तू लंपास करण्यात आले आहे. रेल्वेच्या S 5 ते S 9 या डब्यांबर दगडफेक करुन दरोडा टाकण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी ॲम्बुलन्स उभी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे दरोडेखोर ॲम्बुलन्समधून आल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांना मिळत आहे. 5 एप्रिल रोजीही नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांतून भीती व्यक्त केली जात आहे.

व रेल्वे थांबवून दरोडा घालण्याचा प्रयत्न झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. यावेळी रेल्वेवर प्रचंड दगडफेकही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रेल्वेवर मध्यरात्री दरोडा आणि दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

रेल्वे पोलिसांकडून चौकशी

याबाबत रेल्वे प्रशासनाकडून मात्र अजून सविस्तर माहिती देण्यात आली नाही. दरोडा पडल्यानंतर काही चोरीला गेले आहे का किंवा रेल्वेतील प्रवाशी अजून कोणी जखमी आहे का याची चौकशी सुरु असल्याचे सांगितले.  देवगिरी एक्स्प्रेसवर ज्यावेळी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी रेल्वे पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ होती.

रेल्वे डब्यांबर प्रचंड दगडफेक

रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांनी रेल्वेच्या सिग्नला कापड बांधून रेल्वे थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी रेल्वेच्या 5 नंबरच्या डब्यापासून 9 नंबरच्या डब्यापर्यंत प्रचंड दगडफेक करण्यात आली. यामध्ये कोणी जखमी झाले आहे का याची चौकशी सुरु असून घटनास्थळी औरंगाबाद रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि रेल्वे पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.

रेल्वे सिग्नलला कापड बांधून दरोडा टाकण्याचा प्रयत्न

देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकावर ही घटना घडी. सिग्नलला कापड बांधून रेल्वेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. दरोडेखोरांनी रेल्वेवर तुफान दगडफेकही केली. 5 नंबरच्या डब्यापासून 9 नंबरच्या डब्यापर्यंत दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. सध्य या बाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

संबंधित बातम्या

Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत

Grips Festival : आला रे आला…! दोन वर्षांच्या सुट्टीनंतर मुलांसाठी पुण्यात ग्रिप्स थिएटर फेस्टिव्हल! काय खास? वाचा…

Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.