जन्मभर मुंजा ठेव, पण अशी बायको नको, औरंगाबादेत पत्नी पीडितांकडून पिंपळपौर्णिमा साजरी! काय म्हणतात हे नवरे?

पत्नी पीडितांनी सोमवारी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. हर हर मुंजा करतो पूजा, बायकोपासून सोडव आता... या भारुडासह विविध कविता, आरती, लोकगीते गाऊन पिंपळाच्या झाडाला सरळ 108 आणि त्यानंतर उलट्या 108 प्रदक्षिणा मारल्या.

जन्मभर मुंजा ठेव, पण अशी बायको नको, औरंगाबादेत पत्नी पीडितांकडून पिंपळपौर्णिमा साजरी! काय म्हणतात हे नवरे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 1:54 PM

औरंगाबादः सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची (Banyan Tree) पूजा आज महिला वर्गाकडून करण्यात येते. पण औरंगाबादेत काही पुरुषांनी पुरुषांनी याउलट मागणी करत पिंपळालाच उलट फेऱ्या मारल्या. या पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली. वटपोर्णिमा (Vatpaurnima) साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून आम्ही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला पिंपळ पूजन करतो, मुंजाला साकडे घालतो की ‘हे मुंजा आम्हाला अशा भांडखोर बायका देऊन मरण यातना दिल्यापेक्षा कायम स्वरूपी मुंजा ठेव.. असं या पुरुषांनी सांगितलं. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील करोडी येथे पत्नी पीडीत पुरुष (Victim Of Wives) संघटनेचा आश्रम आहेय या संघटनेच्या वतीने वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

पिंपळाला सरळ आणि उलट्या 108 प्रदक्षिणा

पत्नी पीडितांनी सोमवारी आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी केली. हर हर मुंजा करतो पूजा, बायकोपासून सोडव आता… या भारुडासह विविध कविता, आरती, लोकगीते गाऊन पिंपळाच्या झाडाला सरळ 108 आणि त्यानंतर उलट्या 108 प्रदक्षिणा मारल्या. भांडखोर पत्नीपासून मुक्ती मिळावी व तिला सत्कार्य करण्याची सुबुद्धी यावी, यासाठी देवाला साकडं घालण्यात आलं. या वेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग घुसिंगे, भिकन चंदन आदींची उपस्थिती होती.

हे सुद्धा वाचा

पत्नीपीडित पुरुषांचं म्हणणं काय?

  • नवऱ्याला जिवंतपणी मरण यातना देतात व वट पौर्णिमेच्या पवित्र दिवशी वट वृक्षाची पूजा करतात मग ती पूजा नेमकी कुणासाठी?
  • एकीकडे नवऱ्याला असह्य वेदना द्यायच्या व दुसरीकडे वट पोर्णिमा साजरी करून पती प्रेमाचा आव आणायचा, हे कशासाठी?
  •  खूप खूप वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या. त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवल्या गेले. हे बनवताना पुरुष अबल होतील, याची काळजी घेतली गेली नाही.
  •  स्त्री-पुरुष समानता करता करता स्त्रीने पुरुषांना केव्हा गुलाम बनवले हे कळलेच नाही.
  • भारत हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश मानल्या जातो, त्यामध्ये आता स्त्रिया राजा झाल्या व प्रधानाला गुलाम बवले .भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटला परंतु ह्या एकतर्फी कायद्यामुळे पुरुष महिलांच्या गुलामगिरीच्या विळख्यात अडकला आहे . व त्यासाठी आता पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे.
  •  बहुतांश पत्नीपीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून व समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहेत. N C R B अहवालावरून हे स्पष्ट होते .त्यामुळे लिंग भेद न करता कायदे बनल्या गेले पाहिजे तसेच पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण दिले गेले पाहिजे .
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.