Aurangabad | खातेधारकांच्या खिशात कार्ड, तरीही चोराने एटीएममधून पैसे कसे काढले? औरंगाबादेत सव्वा तीन लाखांची फसवणूक

व्यवस्थापकांनी सखोल पाहणी केली असता बँकेच्या वेगवेगळ्या खातेधारकांच्या खात्यावरून एकूण 03 लाख 24 हजार 700 रुपये एटीएम कार्ड क्लोन करून काढले गेल्याचे उघडकीस आले.

Aurangabad | खातेधारकांच्या खिशात कार्ड, तरीही चोराने एटीएममधून पैसे कसे काढले? औरंगाबादेत सव्वा तीन लाखांची फसवणूक
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 8:24 AM

औरंगाबादः खातेधारकाच्या खिशात त्याचे एटीएम कार्ड (ATM Card) असताना दुसऱ्याच कार्डद्वारे त्याच्या खात्यातून पैसे चोरल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. एटीएम कार्ड क्लोन करून भामट्याने ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) जिन्सी पोलीस ठाण्यात (Aurangabad Police) या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानुसार तपास केला असता सदर एटीएम सेंटरमधील फुटेजमध्ये एक भामटा पैसे काढताना कैद झाला आहे. पोलिस आता या भामट्याच्या मागावर आहेत.शहरातील सेव्हन हिल भागातील लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. 05 नोव्हेंबर 2021 ते 01 फेब्रुवारी 2022 या काळात ही चोरी झाल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांनी फिर्यादित म्हटलं आहे.

कुठे घडली घटना?

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर बळीराम वैद्य हे लोकविकास नागरी सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. 27 जानेवारी 2022 रोजी ते बँकेत असताना छत्रपती राजर्षी शाहू बँक, शाखा वाळूजचे व्यवस्थापक थोरे आणि हे बँकेत आले. त्यांनी वैद्य यांना सांगितले की, 26 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या बाँकेच्या खातेधारकाचे एटीएम कार्ड खातेधारकाजवळ असताना लोकविकास बँकेजवळील एटीएममधून कुणीतरी पैसे काढले आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्टँडर्ड अर्बन लि. शाखा एमजीएम कँपसचे आयटी अधिकारी शैलेश यांनीही अशीच तक्रार केली. त्यांच्या बँकेच्या खातेधारकांचे एटीएम कार्ड त्यांच्याकडेच असताना याच एटीएममधून 06 हजार रुपये कुणीतरी काढले. दोन्ही घटनांबाबत वैद्य यांनी त्यांचे आयटी मॅनेजर चव्हाण यांना माहिती दिली. त्यानुसार बँकेच्या आयटी विभागाने यासंदर्भातील तपास सुरु केला.

एटीएम कार्डचे क्लोन करून फसवणूक?

बँकेच्या आयटी विभागाने तपास केला असता कुणीतरी एटीएम कार्ड क्लोन करून खातेधारकांचे पैसे काढल्याचे आढळून आले. व्यवस्थापकांनी सखोल पाहणी केली असता बँकेच्या वेगवेगळ्या खातेधारकांच्या खात्यावरून एकूण 03 लाख 24 हजार 700 रुपये एटीएम कार्ड क्लोन करून काढले गेल्याचे उघडकीस आले. 26 जानेवारीचे लोकविकास बँकेच्या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एकजण बराच वेळ थांबलेला दिसून आला. त्याने 2-3 एटीएम कार्ड वापरून पैसे काढून खिशात टाकताना दिसत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.