Aurangabad Video : तो दया मागत होता अन् ते हैवानासारखे मारत होते, औरंगाबादच्या खूनानं महाराष्ट्र हादरला, माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

शहरातील टीव्ही सेंटर (TV Center) परिसरात मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली. पाच ते सहा जणांनी एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी तुडवत जबर मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी (Aurangabad police) एकाला ताब्यात घेतलं आहे. यात माजी नगरसेवकाच्या (Former corporator) मुलाचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.

Aurangabad Video : तो दया मागत होता अन् ते हैवानासारखे मारत होते, औरंगाबादच्या खूनानं महाराष्ट्र हादरला, माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 6:32 PM

औरंगाबादः शहरातील टीव्ही सेंटर (TV Center) परिसरात मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली. पाच ते सहा जणांनी एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी तुडवत जबर मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी (Aurangabad police) एकाला ताब्यात घेतलं आहे. यात माजी नगरसेवकाच्या (Former corporator) मुलाचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून औरंगाबादमध्ये हा थरारक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाच ते सहा जण एका तरुणाला काही कारणावरून जबर मारहाण करताना दिसतात. त्यानंतर लाकडी दांडुक्यानेही तरुणाला मारहाण केलेली व्हिडिओत दिसली. या भांडणात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

मयत तरुण कोण?

औरंगाबाद येथील या घटनेत मनोज शेषराव आव्हाड या तरुणाचा मृत्यू झाला. एका माजी नगरसेवकाच्या लॉनवर तो कामाला होता. पाच ते सहा जणांनी त्याला ही मारहाण का केली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. विशेष म्हणजे काहीजण त्याला मारत असताना इतर मारेकऱ्यांनी या घटनेचे व्हिडिओ बनवले आणि ते सोशल मीडियावर देखील टाकले. त्यानंतर आज सकाळपासून या थरारक व्हिडिओची चर्चा औरंगाबादमध्ये होती. तसेच शहरात दिवसेंदिवस अशा मारहाणीच्या घटना वाढत असताना पोलीस काहीच कारवाई करत नाही, याबद्दल नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

सिडको ठाण्यात गुन्हा, संशयितांना अटक

दरम्यान, मनोज शेषराव आव्हाड या तरुणाच्या मृत्यूचं कारण नेमकं समजू शकलेलं नाही. बुधवारी दिवसाढवळ्या तरुणाची हत्या झाल्याने औरंगाबाद हादरले. या हत्या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एका माजी नगर सेवकांच्या मुलासह आणखी एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या-

MI vs CSK IPL 2022: चेन्नई विरुद्ध आज मुंबईसाठी ‘करो या मरो’, Play off साठी किती पॉइंटस हवे? समजून घ्या गणित

‘एक महानायक- डॉ. बी. आर. आंबेडकर’ मालिकेत महत्त्वाचा अध्याय; सयाजीराव गायकवाड भीमरावांना देणार शिष्यवृत्ती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.