आता 1000 च्या पुढच्या लाखो रुपयांच्या लडींचे करायचे काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐनवेळच्या बंदीने व्यापाऱ्यांसमोर संकट
सोमवारी औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने फटाके विक्रेत्यांना एक हजारावरील लड विक्री करण्यास मनाई करत उद्यापासून दुकानांची तपासणी करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे फाटाका व्यापाऱ्यांना चिंता लागली आहे.
औरंगाबादः दिवाळीच्या सणात ऐन वेळी औरंगाबादमधील जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने (Aurangabad police) एक हजारावरील लडींची विक्री करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे शहरातील फटाका व्यापारी संकटात सापडले आहेत. व्यापाऱ्यांनी पंधरा दिवसांपासून शहरात दुकाने थाटली असून त्यात 1000 च्या पुढील लडींचाही समावेश आहे. आता या लडींची विक्री करता येत नसल्याने लाखो रुपये किंमतीचा माल आता काय करायचा, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे.
सलग दोन वर्षे फटाके बाजाराला फटका
कोरोनामुळे मागील सलग दोन वर्षे फटाक्यांचा बाजाराला नुकसान सहन करावे लागले. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांनाही दिलासादायी चित्र दिसत आहे. पण सोमवारी औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने फटाके विक्रेत्यांना एक हजारावरील लड विक्री करण्यास मनाई करत उद्यापासून दुकानांची तपासणी करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे फाटाका व्यापाऱ्यांना चिंता लागली आहे.
दुकाने थाटतानाच कल्पना द्यायला हवी होती-व्यापारी
प्रशासनाने फटाके मार्केटला परवानगी देतानाच यासंबंधीचे नियम स्पष्ट करणे आवश्यक होते. त्यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान टळले असते, अशी प्रतिक्रिया फटाका व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
धनत्रयोदशीला मोठी खरेदी
दरम्यान, धनत्रयोदशीला फटाक्यांची भरपूर खरेदी केली जाऊ शकते, असा अंदाज आहे. रविवारपासूनच बाजारात गर्दी वाढत आहे. मंगळवारी सराफा बाजारात व टिळकपथवरील कापड दुकानांमध्ये सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.
इतर बातम्या-