AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये नरेंद्र मोदींची 31 फुटी इकोफ्रेंडली प्रतिमा, कुलस्वामिनी कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध

भाजपच्या सांस्कृतिक आघाडी व कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांच्या संकल्पनेतून ही प्रतिमा साकारण्यात आली. या प्रतिमेचेची निर्मिती केवळ चार दिवसात करण्यात आली.

औरंगाबादमध्ये नरेंद्र मोदींची 31 फुटी इकोफ्रेंडली प्रतिमा, कुलस्वामिनी कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध
औरंगाबादमध्ये नरेंद्र मोदी यांची 31 फुटांची इको फ्रेंडली प्रतिमा साकरण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 1:53 PM

औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी (Birthday of Narendra Modi) यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त औरंगाबादमध्येही विविध कार्यक्रम अजूनही घेतले जात आहेत. या मालिकेत नुकताच आणखी एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला. नरेंद्र मोदी यांची भव्य इकोफ्रेंडली प्रतिमा (Eco Friendly image) साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांचीही गर्दी होत आहे.

40 किलो शाडू मातीचा मुखवटा

नरेंद्र मोदींची ही इको फ्रेंडली प्रतिमा शंभर टक्के इको फ्रेंडली आहे. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य पर्यावरण पूरक आहे. यात 40 किलो शाडू मातीचा मुखवटा तयार करण्यात आला. तसेच प्रतिमेच्या हातांसाठी लाकडी फळ्या वापरण्यात आल्या. तसेच प्रतिमेतील इतर भाग आणि सजावटीसाठी 40 किलो गहू, 20 किलो तांदूळ, कागदी फलक, कापड, फुलझाडे आदी साहित्य वापरण्यात आले.

कोणी साकारली प्रतिमा?

भाजपच्या सांस्कृतिक आघाडी व कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांच्या संकल्पनेतून ही प्रतिमा साकारण्यात आली. या प्रतिमेचेची निर्मिती केवळ चार दिवसात करण्यात आली. निर्मितीसाठी अलका कोरडे, पल्लवी कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, अच्युत कुलकर्णी, चंद्रमुनी जायभाय, ज्ञानेश्वर सागरे, अनिल गावंडे, प्रल्हाद गायकवाड, अतिक पठाण आदींनी मेहनत घेतली. कुलस्वामिनी कार्यालय सिडको येथे ही प्रतिमा पाहण्यास एक आठवडा उपलब्ध असणार असल्याच विलास कोरडे यांनी सांगितलं. आमदार अतुल सावे यांच्या हस्ते नुकतंच या प्रतिमेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाऊराव देशमुख, शहर अध्यक्ष संजय केनेकर, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश चिटणीस प्रविणजी घुगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये ,राजेश मेहता, शिवाजी दांडगे, गणेश नावदंर, अरुण पालवे,सतीश खेडेकर, अदवंत माधुरी , रेखा पाटील, मनीषा भन्साली,राऊत ताई,मुंडे मनिषा,दिव्या पाटील,नितीन खरात,थेटे लक्ष्मण, अरुण राऊत,इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यभरात वाढदिवानिमित्त विविध ठिकाणी सेवा व समर्पण

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सेवा व समर्पण उपक्रमाला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते बियाणांचे वितरण करण्यात आले. नाशिक येथे नवजात बालकांपासून ते 18 वर्ष वयापर्यंतच्या लाभार्थीसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी उपस्थित होत्या. नागपूर येथे महानगर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते यांच्या उपस्थितीत गरजूंना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. मुंबईत माटुंगा येथील डेविड ससून चिल्ड्रेन स्कूलमधील मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

इतर बातम्या- 

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचं ‘सेवा व समर्पण’ अभियान, कुठे कोणता उपक्रम?

Ayushman Bharat Digital Mission: देशभरातील सर्व रुग्णालये जोडणार, प्रत्येकाला हेल्थ आयडी देणार, जाणून घ्या मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख गोष्टी

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.