AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना भाजप युतीवर मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा बोलले, नितीन गडकरीच हा पूल बांधू शकतील कारण…

शिवसेना- भाजपच्या युतीसंरर्भात वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अब्दुल सत्तारांची चांगलीच कानउघडणी केली होती. अब्दुल सत्तार यांची अजून हळद आणखी उतरायची आहे, अशा तिखट शब्दात त्यांची कानउघडणी केली होती. आता पुन्हा एकदा सत्तार यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना भाजप युतीवर मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा बोलले, नितीन गडकरीच हा पूल बांधू शकतील कारण...
सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचं युतीसंदर्भात पुन्हा वक्तव्य
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 1:11 PM
Share

औरंगाबादः भाजप आणि शिवसेना युतीचा पूल बांधण्यासंदर्भात वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आणलेल्या अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य केलं आहे. महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना यासंदर्भात वक्तव्य केले. ते म्हणाले, नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. दोन व्यक्तींची मनं जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युतीचा अधिकार माझ्या हातात नाही, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी सिल्लोड येथे बोलताना दिली.

नितीन गडकरीच करू शकतील कारण….

शिवसेना आणि भाजपमधील युतीसाठीचे प्रयत्न नितीन गडकरीच करू शकतील, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. हे सांगताना त्यांनी स्पष्टीकरणही दिले. नितीन गडकरी हा माणूस मागील 30 वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केलं. दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात तर दोन व्यक्तींची मनही जुळवू शकतात. त्यामुळे मी हे विधान केलं. मी कालही तेच विधान केलं आणि आजही करतोय, असा पुनरुच्चान अब्दुल सत्तार यांनी केलं.

यापूर्वीही सत्तारांचं दिल्लीत विधान आणि कानउघडणीही!

यापूर्वीदेखील अब्दुल सत्तार यांनी युतीसंदर्भात हेच वक्तव्य दिल्लीत केलं होतं. तसेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे युतीच्या चर्चांना आणखी उधाण आलं होतं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अब्दुल सत्तारांची चांगलीच कानउघडणी केली होती. अब्दुल सत्तारांना शिवसेनेत येऊन किती दिवस झाले? अब्दुल सत्तार यांची अजून हळद आणखी उतरायची आहे, अशा तिखट शब्दात संजय राऊत यांनी त्यांची कानउघडणी केली होती. आता पुन्हा एकदा सत्तार यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आदित्य ठाकरेंसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन

सिल्लोडमध्ये आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. गल्लोगल्ली, दारोदारी भगवे झेंडे फडकवण्यात आले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिल्लोड नगरपरिषदेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

Kharif Season: अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षाही कमी, घोषणांचा पाऊस, सवलतीचे काय?

अजित पवारांचा मुलगा जय पवार याचे कारनामे उघड करणार, तो तुरुंगात जाणार : किरीट सोमय्या

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.