AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Election| सोयगाव नगरपंचायतीनंतर आता ग्राम पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरु

आगामी एप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचे संकेत सध्या निवडणूक विभागाकडून दिले जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार सध्या त्या दिशेने कामाला लागले आहेत. तालुक्यातील तीन गट आणि सहा गणांच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Aurangabad Election| सोयगाव नगरपंचायतीनंतर आता ग्राम पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरु
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः जिल्ह्यातील (Aurangabad district) सोयगावमधील नगरपंचायत (Soygaon Nagar panchayat) निवडणुकीनंतर आता तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या दुसर्या टप्प्याच्या निवडणुकांचे संकेत मिळाले आहेत. 31 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत ग्राम पंचायतींची हद्द निश्चिती, प्रभागनिहाय रचना आणि आरक्षण निश्चिती करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. तालुक्यातील वनगाव, घोरकुंड, वाडीसुतांडा, नायगाव, कंकराळा, रावेरी, सावरखेडा, लेनापूर आणि वरखेडी ठाणा या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे आता सोयगावात नगरपालिकेनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. सोयगाव नगरपालिकेवर शिवसेनेने (Shiv Sena) दणदणीत विजय मिळवला आहे.

प्रभागरचनेचे काम सुरु

जानेवारी ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक विभागाने प्रभाग रचना व आरक्षण पद्धतीची कारवाई हाती घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींचा दुसरा टप्पा व त्यासोबत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. सोयगाव वगळता तालुक्यात तीन गट आणि सहा गणांसाठी 96 मतदान केंद्रावर 82 हजार 640 मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून नव्याने कार्यक्रम प्राप्त झाल्यास नवीन मतदार वाढू शकतात.

नव्या रचनेवर इच्छुकांचे लक्ष

आगामी एप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचे संकेत सध्या निवडणूक विभागाकडून दिले जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार सध्या त्या दिशेने कामाला लागले आहेत. तालुक्यातील तीन गट आणि सहा गणांच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

सोयगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा विजय

औरंगाबाद जिल्ह्यात केवळ सोयगाव नगरपंचायतीसाठी यंदाची निवडणूक झाली. ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडली. 21 डिसेंबर आणि 18 जानेवारीला यासाठी मतदान घेण्यात आले. सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आता नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगरपंचायतीवर शिवसेनेचे स्पष्ट बहुमत आले. 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हे पद एसटी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Dombivali Banner : डोंबिवलीतील ‘तो’ मनसेचा बॅनर ठरतोय लक्षवेधी, शिवसेनेला केले टिकेचे लक्ष्य

Wine In Maharashtra : मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, डेरी बंद करा वायनरी काढा-सदाभाऊ खोत

भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.